एमआयडीसी मध्ये 'टर्फ' चे शानदार उदघाटन; परिसरातील विविध क्षेत्रातील खेळाडूंना पर्वणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 28, 2024

एमआयडीसी मध्ये 'टर्फ' चे शानदार उदघाटन; परिसरातील विविध क्षेत्रातील खेळाडूंना पर्वणी

एमआयडीसी मध्ये 'टर्फ' चे शानदार उदघाटन; परिसरातील विविध क्षेत्रातील खेळाडूंना पर्वणी 
बारामती: प्रतिनिधी 
बारामती औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मधील विविध कंपन्या  मधील अधिकारी, कामगार व परिसरातील   जागृत खेळाडू यांना टर्फ  च्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार व खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल अशी अपेक्षा पियाजो वेहिकल्स कंपनीचे एच. आर .मॅनेजर किरण चौधरी यांनी प्रतिपादन केले.
'द स्काय व्हिजन कल्ब' ने आयोजित बारामती हाय टेक टेक्सटाईल शेजारी कुंभरकर वस्ती येथे एमआयडीसी मधील खेळाडू साठी 
टर्फ चे उदघाटन व  हाफ पीच नाईट क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते याचे उदघाटन करताना किरण चौधरी खेळाडूंना मार्गदर्शन करत होते .
या प्रसंगी 
कॅाटन किंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष खंडू गायकवाड ,बारामती हाय टेक टेक्सटाईल पार्क चे व्यवस्थापक अनिल वाघ , पियोजो कंपनीचे चे  चंद्रकांत काळे, श्रायबर डायनॅमिक डेअरीचे एच आर मॅनेजर मुकेश चव्हाण ,गोदरेज ऍग्रोवेट चे प्लांट हेड संपत सुंदर,वंजारवाडी चे सरपंच जगन्नाथ वणवे,
समर्थ उद्योग समुहाचे संचालक शहाजी कुंभरकर व नवनाथ अप्पा कुंभरकर , इतिहास अभ्यासक राहुल झाडे व अॅड. योगेश वाघ , बारामती  दुध संघ संचालक अॅड . नितीन आटोळे  उद्योजक  योगेश देवकर , रामचंद्र शिंदे, गणेश मोरे , सुधीर खोत , चेतन कुंभरकर  आदी मान्यवर, खेळाडू,प्रशिक्षक व प्रेक्षक उपस्थित होते.
एमआयडीसी व परिसरातील खेळाडूंना शहरातील मैदानाचा कामातील  वेळेअभावी फायदा घेता येत नाही परंतु सदर टर्फ मुळे महिला व पुरुष खेळाडूंना नक्की फायदा होईल  असे मत कॉटन किंग चे खंडू गायकवाड यांनी व्यक्त केले.
ग्रामीण  व एमआयडीसी भागातील  खेळाडूंना व विशेषतः कामगारांना याचा फायदा व्याहवा हा मुख्य उद्देश्य असून या माध्यमातून विविध स्पर्धा व सामन्याचे आयोजन  नियमीत पणे केले जाणार असल्याची माहिती प्रा रामचंद्र शिंदे यांनी दिली.
उदघाटन प्रसंगी बारामती परिसरातील  २२ संघांनी सहभाग घेतला व टर्फ च्या उत्तम बांधणी व आखणी बदल समाधान व्यक्त केले.
द स्काय व्हिजन कल्ब चे विषवस्त शहाजी कुंभरकर यांनी स्वागत केले अनिल सावळेपाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अमित लोंडे यांनी मानले.


No comments:

Post a Comment