पुणे ग्रामीण पोस्टल विभागातर्फे दिनांक 14.06.2024 रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..
पुणे:- रक्तदान अमूल्य आहे. सध्या उन्हाळामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कुठे तरी, कुणाला तरी, तुमची गरज आहे. थोडक्यात महत्वाचे मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही आणि ते कृत्रिमरित्या कुठे तयार होत नाही. रक्त अधिक काळ साठवूनही ठेवता येत नाही. रक्तदान कोण करू शकतो.? वय वर्षे १८ ते ६५ या वयोगटातील स्त्री -पुरुष रक्तदान करू शकतात. रक्तदानासाठी वजन ५० किलो आवश्यक आहे. योग्य वैद्यकीय तपासणी नंतरच रक्तदान घेतले जाते. एक रक्तदाता एका वेळी फक्त एकच युनिट (३५० मि. ली.) रक्तदान करू शकतो. व एकाच वेळी किमान तीन रुग्णांची गरज पूर्ण होऊ शकते. आपल्या शरिरात ५ ते ६ लिटर रक्त असते. त्यातील फक्त ३५० मि.ली. लिटर रक्त म्हणजे फक्त ५% रक्त घेतले जाते.
रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे...
✅ वयाच्या १८ ते ६५ वर्षापर्यंत रक्तदान करता येते.
✅ वजन कमी ५० कि.ग्रॅ. च्या वर असावे.
✅ रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास..
✅ आपण पूर्णपणे निरोगी असल्यास..
✅ दर तीन महिन्यांनी आपण रक्तदान करावे.
✅ जवळच्या शासकीय रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात आपण रक्तदान करू शकता.
रक्तदान कोण करू शकत नाहीत ?
❌ मागील ३ दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले असल्यास.
❌ मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
❌ मागील एक वर्षात विषमज्वर, काविळ किंवा श्वानदंश होवून रेबीजची लस घेतली असल्यास.
❌ सहा महिन्यापूर्वी आपली मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.
❌ गर्भवती महिलेला १ वषार्खालील मूल असल्यास. किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास.
🩸 कायमचे बाद रक्तदाते :-
❌ कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, काविळ (ब, क प्रकारची), एड्स, मुत्रपिंड रोग, यकृताच्या व्याधी असल्यास.
🩸 रक्तदानाचे फायदे :
✅ रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, काविळ (ब, क पकारची), मलेरिया)
✅ वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.
✅ रक्तगट व हिमोग्लोबीनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.
✅ बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
✅ नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात नव चैतन्य निर्माण होते.
✅ नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय, यकृता सारखे अवयव स्वस्थ राहतात.
🩸 रक्तदाता कार्ड...
स्वेच्छेने रक्तदान करणा-या प्रत्येक रक्तदात्याला लगेच रक्तदाता प्रमाणपत्र व कार्ड दिले जाते. या कार्डावर संपूर्ण महाष्ट्रातील शासकीय रक्तपेढीत दोन वर्षां पर्यंत रक्तदात्यास त्याच्या नातेवाईकास किंवा त्याच्या मित्र परिवारापैकी कुणालाही रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त दोन वर्षां पर्यंत मोफत दिले जाते. व रुग्णाचे प्राण वाचविल्यामुळे आत्मिक समाधान मिळते. तसेच तीन रुग्णांचे प्राण वाचविल्याचा पण आनंद होतो. हे आव्हान आहे कळकळीचे,रक्तदानाने साधणाऱ्या आपुलकीचे, कुणा गरीब, गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्याचे.
दिनांक 14.06.2024 रोजी पुणे ग्रामीण पोस्टल विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन शिवाजी नगर मुख्य डाकघर येथे सकाळी 10.00 वाजता करण्यात आले आहे. आपण सर्वांनी रक्तदान करण्यासाठी आपला सहभाग जास्तीच्या संख्येने नोंदवावा आणि देशसेवेमध्ये आपला खारीचा वाट उचलावा तसेच टपाल खात्याच्या पोस्टल लाईफ इन्शुरन्स, जनरल अक्सिडेंट इन्शुरन्स आणि पोस्टाच्या विविध योजनेंचे माहिती देण्याचे शिबीर देखील या वेळी आयोजीत करण्यात आले आहे याचा देखील लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री. बाळकृष्ण एरंडे सर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment