खळबळजनक..पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 15, 2024

खळबळजनक..पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या...

खळबळजनक..पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या...
मुंबई :- आत्महत्या करणाऱ्याचे प्रमाण वाढत असून राग शांत होणं गरचेच आहे, होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या जास्त होत असल्याचे दिसत आहे, नुकताच मुंबई पोलीस  दलात कार्यरत असणाऱ्या एका  पोलीस
कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना
घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 14)
रात्री घडली आहे. विजय साळुखे (वय-38)
असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
त्यांनी सायनमधील प्रतीक्षा नगर येथे
राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पत्नीच्या त्रासाला कंटाळून विजय यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट
सापडली असून पोलिसांनी जप्त केली
आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय साळुखे
सायनच्या प्रतीक्षा नगर येथे राहत होते.
मुंबईच्या शाहुनगर पोलिस स्टेशन मध्ये 30 मे रोजी बदली झाली होती. मात्र आजारपणाचं कारण देत त्यांनी सुट्टी घेतली होती. साळुंखे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. मुंबईतील वडाळा टी टी पोलिसांनी साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद केली आहे.घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. साळुंखे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी जप्त केली. साळुंखे यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे
प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment