बारामतीत पारधी समाजाच्या संघर्षाने मिळाला मयताला दफन करण्यासाठी जागा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 17, 2024

बारामतीत पारधी समाजाच्या संघर्षाने मिळाला मयताला दफन करण्यासाठी जागा..


बारामतीत पारधी समाजाच्या संघर्षाने मिळाला मयताला दफन करण्यासाठी जागा..
बारामती:-बारामतीत पारधी समाज आजही उपेक्षित असून त्यांना न्यायासाठी लढावं लागत असल्याचे दिसत आहे नुकताच मयत व्यक्तीला दफन करण्यासाठी केलेल्या संघर्ष त्यांना जागा मिळवून देण्याची तयारीत आहे,याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गणेश पांडुरंग धायगुडे यांच्या प्रयत्नातून मेखळी मधील  पारधी समाजाला न्याय मिळाल्याचं सांगण्यात आलं पारधी समाजाचे निलेश भोसले मयत झाले असता मेखळी गावातील  पुढारी व सदस्य बॉडी व सरपंच दफन करण्यासाठी जागा देत नव्हते अशी संतप्त प्रतिक्रिया देण्यात आले, पिढ्यानपिढ्या आमचे बापजादे यांना दफन करण्यात आले असताना आज ही वेळ का?असा संतप्त सवाल करून बारामती येथील प्रशासकीय भवन समोर मोठ्या प्रमाणात पारधी समाज व महिला जमले होते त्यांनी भोसले यांचे प्रेत प्रशासकीय भवन समोर आणणार असे ठाम होते त्या अनुषंगाने प्रेत ट्रॅक्टर मध्ये आणत असताना रस्त्यात पोलिसांनी अडवून त्यांना त्यांना समजावून सांगितले व संबंधित गावातील पुढारी यांच्याशी चर्चा करून हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला गणेश पांडुरंग गावडे यांनी या विषयांमध्ये हात घालून पूर्णत्वास नेला असल्याचे सांगण्यात आले, तर लवकरच तहसीलदार यांच्याशी चर्चा करून प्रेत दफणसाठी जागा मिळणार असल्याचे सांगितले.यावेळी पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने गुणवडी येथील   विशाल गावडे यांनी दफणसाठी जागा दिली यावेळी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment