धक्कादायक..'विभागीय चौकशीचे प्रकरण मॅनेज
करून देतो' असे म्हणून गटविकास अधिकाऱ्याने ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर..
हिंगोली :-अधिकारीच कर्मचारी महिलेचा विनयभंग करीत असल्याचे घटना समोर आली मिळालेल्या सूत्रांकडून 'विभागीय चौकशीचे प्रकरण मॅनेज करून देतो', असे म्हणून कळमनुरीच्या गटविकास अधिकाऱ्याने ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचा तपास सुरु आहे.लिंबाजी बारगिरे असे गुन्हा दाखल झालेल्या गटविकास
अधिकाऱ्याचे नाव आहे. पीडित ग्रामसेविका पातूर येथे राहते. जुलै २०२२ ते जून २०२३ या काळात अकोला पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना त्यांची कार्यालयीन विभागीय चौकशी बार्शीटाकळी येथील सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांकडे सुरू आहे. दरम्यान, सध्या कळमनुरी येथे कार्यरत असलेले गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे हे अकोला पंचायत समितीत कार्यरत होते.शुक्रवारी (दि.14) बारगिरे याने पीडित ग्रामसेविकेला फोन करून तुझे विभागीय चौकशीचे प्रकरण पूर्ण मॅनेज करून
देतो, असे म्हणून त्यांना अकोला येथे बोलावले. त्यामुळे शनिवारी (दि.15) ग्रामसेविका अकोला येथे गेल्या. मात्र,तेथे गटविकास अधिकारी बारगिरे यांनी ग्रामसेविकेचा विनयभंग केला.याबाबत तपास असल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment