पुणे टपाल क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सर्व डाक विभागातील कर्मचारी व त्यांच्या पाल्यां करता विविध सांस्कृतिक कार्यक्रम चाचण्यांचे आयोजन..
पुणे:-पुणे ग्रामीण डाक विभागाच्या वतीने दिनांक 01 जून 2023 रोजी डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल ,कोरेगाव पार्क, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुणे सातारा अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यातील डाक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता , दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. निवड समितीमध्ये श्री एस. डी. मोरे (सहाय्यक अधीक्षक, मुख्यालय ),पुणे ग्रामीण डाक विभाग ,श्रीमती शिल्पा गोऱ्हे ,श्री रतन कुमार , विकास कुचेकर व इतर मान्यवरांचा समावेश होता , श्री आर पी गोसावी व ओम कुलकर्णी यांनी पेटी व तबला वादन करत स्पर्धकांना साथ दिली. या चाचण्यांमध्ये एकांकिका, भरतनाट्यम, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लोकगीत मोनो ॲक्टिग अशा विविध प्रकारच्या स्पर्धां घेण्यात आल्या. लोकांच्या कलेला वाव भेटावा म्हणून पोस्ट ऑफिस मध्ये पण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा घेतल्या जातात. यामधून निवड झालेल्यांना महाराष्ट्र राज्य पातळीवर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पाठविण्यात येणार आहे . अशी माहिती श्री बाळकृष्ण पी एरंडे, अधीक्षक डाकघर ,पुणे ग्रामीण विभाग यांनी दिली या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेखा गोडघासे यांनी केले व श्री एस डी मोरे यांनी सर्व स्पर्धकांचे व इतर मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment