विकसित बारामतीत प्रशासकीय भवन नंतर पोलीस इमारतीला गळती..
बारामती :-उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी बारामतीच्या विकासाला चालना मिळावी बारामतीत प्रशस्त अश्या शासकीय इमारती उभा करण्यासाठी करोडो रुपये निधी आणला,भल्या पहाटे अनेक कामाची स्वतः पाहणी केली का तर कामे चांगल्या दर्जाची व्हावी हाच उद्देश त्यांचा असावा, परंतु अशी काही ठिकाणी अजितदादा यांचा दौरा असेल त्यावेळी अधिकारी मात्र हजर असतात आणि इतर वेळेस कुठे जातात हे समजू शकले नाही म्हणूनच की प्रशासकीय भवन सारखे भव्य इमारतीचे काम व त्यात झालेला हलगर्जीपणा (जसा की आत्ता तीन हत्ती चौक येथे पुन्हा पुन्हा वारंवार तोडफोड करून होतोय) दिसून येत आहे, ऐन छतातून पाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टेबलवर पडत होते हे सर्वांनी पाहिले असेलच अशी कितीतरी उदाहरणे आहे पण आत्ता नुकताच झालेले पोलीस इमारत पोलीस प्रशासनाचे कामे व्हावे, त्यासाठी
बारामती शहर पोलीस ठाणे आणि अपर
पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाची
उभारणी करण्यात आली आहे. पैकी
दोन इमारतींमध्ये पोलीसांचे कामकाज
सुरू होऊन चार महिने झाले. मात्र,पहिल्याच पावसात येथील इमारतींना गळती लागली आहे. त्यामुळे इमारतींच्या कामात झालेल्या दर्जेदार कामाची शंका येत असल्याचे सांगण्यात येत आहे. चार महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह
इतर नेत्यांच्या उपस्थितीत या इमारतींचे
उद्घाटन झाले. मात्र, पहिल्याच पावसात या इमारतींना गळती लागली आहे. शहर पोलीस ठाण्यात प्रवेश करताच डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. वाहतूक शाखेच्या
इमारतीमध्येही गळती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत असल्याचे दिसत आहे. यामुळे बारामती करानी मात्र अश्या कामावर देखरेख करणाऱ्या अधिकारी यांच्या हलगर्जीपणा कसा होतेय हे दिसून येत असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment