बारामती आरटीओ कार्यालयाचे पावसाने पडले होते सिलिंग..
बारामती:-बारामतीत विकास झालाय आणि चालू ही आहे, भव्य सरकारी इमारती उभ्या असून ती दर्जेदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी खूप मेहनत घेतली आणि कामेही तशी चालू आहे,नुकताच पाऊस झाला या पावसामुळे पोलीस इमारतीत जसे पाण्याची गळती झाली तशीच काहीशी अवस्था आरटीओ कार्यालयात सिलिंग पडले,सुदैवाने कोणाला ईजा झाली नाही पण अशी कामे अजून काही वर्षेही झाली नाहीत तोवर असे पावसाने गळती होऊन सिलिंग पडणे हे निकृष्ठ दर्जा यातून दिसत असल्याचे बोलले जात आहे,असे अनेक उदाहरणे आहेत जिथे निकृष्ठ दर्जाचे काम झाले, जसे की घाईघाईने केलेले दशक्रिया विधी घाट कमान ढासळली होती त्यावेळी देखील असा हलगर्जीपणा का झाला होता असा सवाल होताना दिसत आला आणि आत्ता भल्या मोठया कोट्यवधी रुपये निधी खर्च करून बांधलेली इमारतीच्या छतातून गळती का झाली असा प्रश्न नागरिकांना पडला असून अधिकारी वर्गावर शंका व्यक्त होऊ लागल्या आहेत.
No comments:
Post a Comment