श्री साईकृपा वि.का.स. संस्थेच्या चेअरमनपदी हेमंत आटोळे यांची बिनविरोध निवड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 23, 2024

श्री साईकृपा वि.का.स. संस्थेच्या चेअरमनपदी हेमंत आटोळे यांची बिनविरोध निवड

श्री साईकृपा वि.का.स. संस्थेच्या चेअरमनपदी हेमंत आटोळे यांची बिनविरोध निवड
दि.२४ बारामती : बारामती तालुक्यातील कटफळ येथील श्री साईकृपा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित कटफळ च्या चेअरमनपदी हेमंत आटोळे तर व्हॉ. चेअरमनपदी सुनंदा रांधवन यांचे बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी अमर गायकवाड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. संचालक मंडळ पुढील प्रमाणे भारत मोकाशी, देविदास झगडे हौशीराम मोकाशी माणिक मोकाशी, दादासो मोकाशी, दादाराम झगडे, दिलीप झगडे, बबन कांबळे सुरेश लोखंडे कविता लोंखडे असे आहे. यावेळी  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*शेतकरी हितासाठी प्रयत्नशील राहणार*

शेतकरी सभासदांच्या निर्णय ग्रामस्थांनी दाखवलेले प्रेम व विश्वास याची पोचपावती म्हणून बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो व शेतकरी सभासद यांचा विश्वासास पात्र राहून शेतकरी हितासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

- हेमंत आटोळे नवनिर्वाचित चेअरमन

No comments:

Post a Comment