उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर कारवाईसाठी महिलांसह आमरण उपोषण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 14, 2024

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर कारवाईसाठी महिलांसह आमरण उपोषण..

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर कारवाईसाठी महिलांसह आमरण उपोषण..
बारामती:-गुन्हेगारी वाढत चालली असून भावकी वाद हा प्रामुख्याने सर्रास घडत असल्याचे दिसत असून नुकताच इंदापूर तालुक्यातील एका गावात घडलेल्या घटनेवरून आरोपीवर कठोर कायदेशिर कारवाई करण्याच्या मागणीसाठी व गुंडांना पाठीशी घालणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी डी. वाय. एस. पी बारामती येथील कार्यालयासमोर दिनांक १४/०६/२०२४ रोजी पासून आम्ही आमरण उपोषण चालू  असून उपोषणकर्ते १) वैभव भिमराव काशीद २) ज्ञानेश्वर भिमराव काशीद ३) भिमराव सीताराम काशीद
४) शकुंतला भिमराव काशीद ५) छत्रपती सिताराम काशीद ६) ज्योती छत्रपती काशीद ७) रतन छत्रपती काशीद ८) संतोष चांगदेव काशीद, सर्व रा. निरवांगी ता. इंदापुर जि. पुणे
यांनी तक्रारी अर्जामध्ये म्हंटले आहे की,आम्ही येथील रहिवाशी असून आमचा आणि नाना सिताराम काशीद रा. निरवांगी ता. इदापूर जि. पुणे यांचेबरोबर शेतीच्या विषयावरून वाद विवाद चालू होता व त्याविषयी मा. न्यायालयात दावा आहे, व त्यावरून आमच्यात व नाना सिताराम काशीद याच्यात सतत वाद विवाद, पोलीस स्टेशन ला केसेस चालू आहेत. दिनांक ३०/५/२०२४ रोजी नाना सिताराम काशीद, शोभा नाना काशीद, सागर नाना काशीद, वैष्णवी सागर काशीद, समाधान नाना काशीद यांनी आमच्यावर हल्ला केला व आम्हाला मारहाण करून जीवे ठार मारण्याचे धमकी दिली. सदर वादविवादाच्या दिवशी त्यांनी, त्यांच्या ओळखीतील मौजे खोरोची आणि निरवांगी येथील नामे १) तुकाराम ज्ञानदेव खरात, २) ऋषिकेश कैलास देवकर, ३) निरंजन पवार, ४) बाला वाघमोडे, ५) सौरभ उर्फ सोन्या
कांबळे, ६) सुमित संतोष कांबळे ७) राजेश भागवत काशीद, आणि अनोळखी ५ ते ६ इसम सर्वजन रा.खोरोची व निरवांगी ता. इंदापूर यांना आमच्यावर जीवघेना हल्ला करण्याच्या उद्देशाने व आम्हाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावात आणले, आणि त्या सर्वांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला करून धारधार शस्त्राने आम्हाला जखमी केले, तसेच लोखंडी रॉड, काठ्या आणि बांधकामाच्या विटाने
आमच्यावर हल्ला करून आम्हाला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केलेला आहे. आमच्यावर हल्ला झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन वालचंदनगर येथे आमची रितसर तक्रार देण्यास गेलो असता, त्या ठिकाणच्या पोलीस अधिका-याने आमची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तसेच आम्हाला तक्रार देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सध्या दवाखान्यात असून आमच्यावर उपचार
चालू आहेत. आम्हाला गंभीर स्वरूपाच्या मार लागलेला असून आमच्या जीवाचे काहीहि बरे वाईट होण्याची शक्यता आहे,आम्ही गंभीर जखमी असताना इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी श्री अनिरुद्ध गार्डे यांनी गुन्हेगारांशी संगनमत करून वैद्यकीय अहवालात फेरफार केला आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर हल्लेखोर इसमावर गंभीर वस्तुस्थितीजन्य गुन्हा दाखल न  करता, थातूरमाथुर गुन्हादाखल केला असून कारवाई चे फक्त नाटक करत आहेत. तसेच त्यांच्या ओळखीचा एक इसम आम्ही दाखल असलेल्या दवाखान्यात आला व "तुम्ही केलेली पोलीस केस परत घ्या, नाहीतर आम्ही तुम्हाला जीवे ठार मारल्याशिवाय राहणार नाही." असे धमकी देऊन गेला आहे. तसेच सदर सर्व आरोपी हे 
उजळमाथ्याने फिरत असल्यानेआम्हाला धमक्या देत आहेत.सदर इसम याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल असल्याचे कळते, तसेच सदर इसम हे सुपा-या घेऊन लोकांना त्रास देणे व जीवे ठार मारण्याचे
कामे करत आहेत असे कळते. कारण त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नसताना त्यांनी आमच्यावर जीवेघेणा हल्ला करून, आम्हाला अजूनही "दिसेल त्या ठिकाणी ठार मारण्याची धमकी दिलेली आहे."सदर इसमाची राजकारणात उठ-बस असून "आमचे हात फार लांब वरपर्यंत आहेत, पोलीस आमचे काही वाकडे करू शकत नाहीत" असे ते वल्गना करत आहेत. आणि पोलीस सुद्धा अगदी त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच वागत आहेत. म्हणून सदर इसमावर जोपर्यंत पोलीस कारवाई होत नाहीत, तोपर्यत
आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय बारामती समोर दिनांक १०/०६/२०२४ रोजी आमरण
उपोषण करणार होतो. परंतु अर्जदारांपैकी काहीजन अध्यापपर्यंत रुग्णालयात उपचार घेत असल्याने दि. १०/०६/२०२४ रोजीचे उपोषण आंदोलन स्थगित करून सदर गंभीर घटनेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १४/०६/२०२४ रोजी पासून आमरण उपोषण आंदोलन सुरू करत आहोत.तत्पूर्वीच सदर गुन्ह्यात संबंधित असणारे गुन्हेगार यांचे वर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना पाठीशी घालणारे वैद्यकीय अधिकारी यांचे वर योग्य ती
कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत
आमरण उपोषणा दरम्यान आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास आपली व प्रशासनाची
जबाबदारी राहील असे पत्र १) वैभव भिमराव काशीद २) ज्ञानेश्वर भिमराव काशीद ३) भिमराव सीताराम काशीद  ४) शकुंतला भिमराव काशीद 
५) छत्रपती सिताराम काशीद ६) ज्योती छत्रपती काशीद ७) रतन छत्रपती काशीद ८) संतोष चांगदेव काशीद,यांनी लेखी निवेदन देऊन आमरण उपोषण चालू केले असून यासंबंधी
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर,मा. पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण कार्यालय चव्हाणनगर पाषाण रोड पुणे - ८ .,मा. अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, बारामती विभाग बारामती मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.इंदापूर तालुका हा राजकीय नेत्यांनी भरलेला आहे, राजकिय ताकद या तालुक्यात भरपूर असल्याने सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी कोण आहे का?हे चित्र याठिकाणी घडत असलेल्या घटनेवरून दिसून येत असल्याचे कळतंय, पोलीस स्टेशनमध्ये असलेला हस्तक्षेप व पोलिसांकडून होत नसलेली योग्य कारवाई चिंतेची बाब बनत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.*सदर घटनेत एका विवाहित महिलेला मनामध्ये भीती बसून चांगलाच धक्का बसल्याचे सांगण्यात आले.आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले, सदर घटनेतील दोन आरोपी अटक असून बाकी अद्याप अटक नसल्याने आम्ही घाबरून गेलो असून कारवाई व्हावी यासाठी येथे बसलो असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment