*मलिदा गॅंग* ला आत्तातरी आवरा..!
लोकसभा गेली,आत्ता विधानसभा तरी सावरा.!!
बारामती:-नुकताच देशातील निवडणुकीचा निकाल लागला धक्कादायक असे निकाल जाहीर झाले,काही एक्झिट पोल फेल गेले, मात्र जनतेने सर्वांनाच गोलमाल केले कारण तशी वेळच आली होती, शेवटी मतदान राजा ठरवितो तसे होते कारण मिळालेल्या एका मताचा अधिकार तो बजाविताना कुठे आणि कुणाला मतदान करेल हे कळत नाही,पण होईल ते धक्कादायक असेल याचं उदाहरण लोकसभा निकाल पाहता लक्षात येईल.. पण यावर चिंतन होणं गरजेचं आहे, पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते प्रामाणिक होते की, नेत्याच्या अवतीभवती असणारे पांढरपेशी पुढारी प्रामाणिक होती की ज्यांना सामावून घेतले ते विरोधक प्रामाणिक होते हे आत्तातरी ओळखले पाहिजे नाहीतर येणारी विधानसभा देखील हातची गेल्याशिवाय राहणार नाही हा यानिमित्ताने इशारा होऊ शकतो, नेत्याने विश्वास ठेवताना आपल्या जवळची किती घातकी आहेत हे जाणले पाहिजे,अजूनही वेळ गेली नाही जनता का नाराज झाली हे शोधले पाहिजे, कार्यकर्ते व मतदार यांनी खऱ्या अर्थाने कोणावर नाराज होऊन मतदान विरोधात केले, जो पर्यंत समजू शकत नाही तोपर्यंत परिस्थितीत बदल होऊ शकत नाही त्यासाठी आपल्या अवती भवती असणारी *मलिदा गॅंग* जी फक्त आपली पोळी भाजून घेतेय व कार्यकर्तेला वाऱ्यावर सोडतीय त्यामुळे झालेले नाराज आपल्या नाराजीचा राग मत रुपी काढतोय हे दिसून आलेय.असाच काहीसा प्रकार चर्चेतून कळलाय बारामती लोकसभा मतदार संघात घडलाय ज्यामध्ये चक्क बारामती विधानसभा क्षेत्रात घड्याळापेक्षा तुतारीला 50 हजाराचं लीड मिळालं जिथे विकसित बारामती म्हणून संबोधल जायचं त्याच बारामतीत मतदान कमी झाल्याने चर्चेला उधाण आले यामागे नक्की काय गणित बिघडले याचं आत्मचिंतन होणं गरजेचं आहे, आणि हे चिंतन झालंच पाहिजे अशी इच्छा प्रत्येकाची असल्याचे बोलताना दिसत आहे. असे किती तरी उदाहरणे आहेत की,ज्यामुळे नाराजी वाढून मतदान घटले याबाबत चर्चेतून व दबक्या आवाजात बोलताना असे कळते की,बारामतीत ठराविक पुढारीच नेत्याच्या जवळजवळ करून आपलं साधून घेतो,सर्वसामान्य,निष्ठावंत कार्यकर्ता यापासुन बाजूला पडत राहिला आणि येथेच वासे फिरले,तर दुसरीकडे मतदान वेळी वार्डातील गटबाजी नडली,पैसे वाटप करताना जवळचा लांबचा केलेला फरक,मंडई चा विषय,एका बँकेने बारामतीच्या जनतेला कर्जबाबत केलेली सक्तीची वसुली,जामीनदारांना वेठीस धरणे,अधिकारी वर्ग सर्व्हसामान्य नागरीकांच्या कामाची हेळसांड,स्थानिक पुढारीची गटबाजी,विकासाच्या नावाखाली ठेकेदार करीत असलेली कामे त्याचा नसलेला ताळमेळ,जिथे आवश्यक असताना नको तिथे होत असलेला खर्च अश्या अनेक गोष्टींमुळे व सर्वात महत्त्वाचे तेच तेच पुढारी पुढे पुढे येऊन कार्यकर्त्यांना सपत्नीक वागणूक देऊन मीच सर्व काही करतो असा अविर्भात असणाऱ्या पुढाऱ्याला वैतागुन मतदान वेगळ्या दिशेला वळाले हे सद्या झालेल्या मतदानातून दिसून आले असल्याचे कळतंय. म्हणूनच आत्तापर्यंत झाले येथील पुढे तरी अशी मंडळी पासून सावध होणं गरजेचं आहे,कुणी तरी म्हटले आहेच की *मलिदा गॅंग* ला आत्ता तरी आवरा..! निष्ठावंताना जवळ करा, विधानसभा सावरा.!!
No comments:
Post a Comment