लोकसभा गेली आत्ता विधानसभा आली आत्तातरी पदाधिकारी बदला;सर्वसामान्याची प्रतिक्रिया. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 23, 2024

लोकसभा गेली आत्ता विधानसभा आली आत्तातरी पदाधिकारी बदला;सर्वसामान्याची प्रतिक्रिया.

लोकसभा गेली आत्ता विधानसभा आली आत्तातरी पदाधिकारी बदला;सर्वसामान्याची प्रतिक्रिया.
बारामती:-राजकिय पक्ष व त्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची पक्षावर असणारी निष्ठा नक्कीच कामी येते ती निवडणूक जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या मतदानातून आणि यासाठी पक्षाचे नेते सांभाळीत असतात ते आपल्या वर असणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे आपल्यावर असणार प्रेम.. पण यंदा लोकसभा निवडणूक झाली यामध्ये धक्कादायक निकाल झाला जे सत्तेत होते त्यांचे उमेदवार पडले,यामागे नक्की काय घडलं की कालपर्यंत आपल्या बरोबर असणारे सर्वसामान्य कार्यकर्ते, मतदार आज असा काय चमत्कार झाला की त्यांनी मतदानातून धक्कादायक व चिंतन करणारा निकाल दिला, याबाबत खरंच पक्षाच्या नेत्यांनी चिंतन केले का की पुन्हा त्याच पुढारी, पदाधिकारी यांच्या वर सर्व विश्वास ठेवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी त्यांना वेळ नाही, कारण लगेचच विधानसभा निवडणुका समोर आहे याचं तरी भान असावं व आत्ता तरी कार्यकर्त्यांच्या भावना समजवून घ्याव्यात अशी प्रतिक्रिया उमटत आहे. आत्ता तरी तेच तेच पदाधिकारी नको जे आपल्या पदाचा वापर फक्त चमकोगिरी साठी आणि वरिष्ठ मंडळी आली की पुढे पुढे करण्यासाठी करीत आहे, मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता प्रामाणिक राहून आपल्या पक्षासाठी काम करीत असतो मात्र त्याची दखल घेतली जात नाही याची काही उदाहरणे देता येईल,पण ते ऐकण्यासाठी नेत्याला वेळ नाही, की त्यांच्या भोवती असणारी तीच तीच मंडळी हे अटकाव करीत असावेत अशी ही प्रतिक्रिया उमटत आहे. लोकसभा निवडणुकीत जे घडले ते विधानसभा निवडणुकीत तरी घडू नये यासाठी पक्ष्याच्या नेते मंडळी यांनी आपल्या अवती भोवती असणारी स्वतः ची पोळी भाजून घेणारी जो पर्यत आपल्या पदाचा नैतिकता म्हणून राजीनामा देत अथवा त्यांना पदावरून हटविले जात नाही तोपर्यंत तरी सर्व सामान्य कार्यकर्ता व मतदार काय आहे हे मताच्या पेटीतून दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही कारण नेता जोपर्यंत याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही तोपर्यंत पक्षात असणारी गट बाजी थांबणार नाही, यामुळे होत असलेली कुरघुडी बंद होणार नाही अशी परिस्थिती तरी सद्या दिसून येत असल्याचे दिसत आहे.लोकसभा झाली आत्ता विधानसभा आली आत्ता तरी तेच तेच पदाधिकारी यांचे राजीनामे घेऊन नव्याने व प्रामाणिक काम करणाऱ्या (जे फक्त दिखाऊ पणा करतात यांना नव्हे)संधी देऊन पुन्हा पक्षवाडीसाठी काम करण्यास संधी मिळेल याच आशेपोटी कार्यकर्ते वाट पाहत आहे.. याची गंबीरतेने दखल घेणे गरजेचे आहे असे कार्यकर्ते बोलताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment