महाराष्ट्रातील नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामती नगर परिषदेच्या वतीने दि.२६ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 25, 2024

महाराष्ट्रातील नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामती नगर परिषदेच्या वतीने दि.२६ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन...

महाराष्ट्रातील नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामती नगर परिषदेच्या वतीने दि.२६ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन...
बारामती:- महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी यांच्या विविध खालील प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामती नगर परिषदेच्या वतीने बुधवार दिनांक २६/६/२०२४रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
१)मा.मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठासमोर महाराष्ट्र शासनाने सफाई कामगारांना वारसा हक्क लागु करणेबाबत शासन स्तरावर ठोस भुमिका मांडुन लवकरात लवकर वारसा हक्क धोरणाबाबत सरसकट सर्व जाती धर्माच्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागु करणे
   तथापि काल मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने फक्त अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागु करणेबाबत दाखल याचिकेवर सुनावणी होऊन निर्णय दिला आहे परंतु खुल्या व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना वारसा हक्काबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे तोही तात्काळ निर्णय व्हावा
२) महानगर पालिका नगर परिषद नगर पंचायत सन २००५पासुन सेवेत दाखल झालेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करुन तातडीने कारवाई करण्यात यावी.
३) सन १९९३पुर्वीच्या रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करुन वारसा हक्क लागु करणेबाबत निर्णय व्हावा बारामती नगर परिषदेमध्ये रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले आहे तथापि त्यांना वारसा हक्क लागु करण्यात आला नाही अशा सर्वांना वारसा हक्क लागु करणेबाबत शासन स्तरावर ठोस निर्णय व्हावा.
४) राज्य सरकारच्या विविध विभागांमधील सर्व कर्मचा-यांना १०,२०,३०वर्ष नोकरीत झाल्यावर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येतो तथापि महानगर पालिका, नगर परिषद/नगर पंचायत मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना कालबध्द पदोन्नती दिली जात नाही तो निर्णय लवकरात लवकर करण्यात यावा
५) राज्यातील सर्व नगर परिषद/नगर पंचायत मधील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे अगर समान काम समान वेतन हे धोरण शासन स्तरावर तातडीने निर्णय घ्यावा
७) राज्यातील सर्व नगर परिषद/नगर पंचायत मध्ये गेली १०वर्षापासुन प्रलंबित असणारी अनुकंपा प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यात यावीत 
८) नगर परिषद नगर पंचायत मध्ये कायम असणाऱ्या कर्मचा-यांना वैद्यकीय विमा शासन स्तरावर तातडीने कारवाई करण्यात यावी 
   अशा विविध मागण्यांबाबत सरकारला जाग येण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामती नगर परिषद याठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अन्यथा ६ऑगस्ट २०२४पासुन बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे असे नगर परिषद नगर पंचायत महाराष्ट्र समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment