शिवराज्याभिषेक (हिंदू साम्राज्य दिन) व श्रीमंत सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते सन्मानसोहळा संपन्न..
बारामती:- श्रीक्षेत्र कन्हेरी बारामतीमध्ये शिवराज्याभिषेक (हिंदू साम्राज्य दिन) व श्रीमंत सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांचा सन्मान सोहळा तिसरे वर्ष मोठ्या उत्साहमध्ये पार पडला.
यावेळी अभिषेक, सत्कार समारंभ, व्याख्याने व महाप्रसादाचा आयोजन श्रीमंत सुभेदार सुभांनजी बळवंतराव देवकाते स्मारक समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते, यावेळी निरावागज,मेखळी, सोनगाव,पिंपळी लिमटेक,काटेवाडी,कन्हेरी, जळोची देवकाते परिवारातील गावातील प्रमुख मंडळी व बारामती परिसरातील हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेतकऱ्यांचे नेते मा.खासदार राजू शेट्टी,मा मंत्री आमदार दत्तामामा भरणे, मा.आमदार ॲड.रामहरी रुपनवर,सतीशभैय्या काकडे,रंजनकाका तावरे,प्रशांत काटे,ॲड.जीबी अण्णा गावडे,मदनराव देवकाते,राजेंद्र ढवाण,तानाजीबापू थोरात,माऊली चावरे,गजानन वाकसे,नारायण कोळेकर, बाळासाहेब पाटील,अमोल पाटील,ॲड रमेश कोकरे,व्याख्याते विवेकजी पांडकर,दिलीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड.रामहरी रुपणवर यांनी मराठाशाहीचा इतिहासाचा अभ्यासपूर्ण मांडणी करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.सूत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले.प्रस्ताविक ॲड.गोविंद देवकाते व आभार प्रदर्शन पाडूरंगमामा कचरे यांनी केले.
No comments:
Post a Comment