*महाराष्ट्र वैद्यकीय प्रतीनीधी संघटनेची (MSMRA) २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; कॉ.किरण नाझीरकर यांची बारामती युनिटच्या सेक्रेटरी पदी एकमताने निवड.*
बारामती:- महाराष्ट्र वैद्यकीय प्रतीनीधी संघटनेची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा बारामतीतील हॉटेल रॉयल वाडा येथे आयोजित करण्यात आली होती,
सर्वप्रथम दिवंगत सहकारी आणि वेगवेगळ्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना संघटनेच्या वतीने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघटनेचे ज्वाईंट सेक्रेटरी कॉ.संजय वाघमोडे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
यानंतर संघटनेचे मावळते सेक्रेटरी कॉ. दत्तात्रय चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषण करताना सर्व कर्मचाऱ्यांना युनियनच्या कामगिरीची व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षात संघटनेची उच्चांकी सभासद संख्या गाठण्यासाठी सर्व कार्यकारिणीची बहुमोल मदत झाली व त्याच बरोबर कामगारांवर होणारया अन्याय अत्याचारा विरुद्ध संप पुकारून लढा उभारला आहे व इथुन पुढच्या काळात देखील खंबीरपणे हा लढा सुरू ठेवण्यासाठी संघटनेत सक्रीय सहभागी होणार असल्याचे सांगितले.
यानंतर संघटनेचे खजिनदार
कॉ. भगवान गायकवाड यांनी खजिनदारांचा अहवाल सादर करताना संघटनेच्या आर्थिक स्थितीची व संघनेच्या माध्यमातून झालेल्या विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यानंतर, कार्यक्रमपत्रिकेनुसार, संघटनेने नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी कॉ.संदीप नलावडे, यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. सर्व कर्मचाऱ्यांचे मत विचारण्यात आले आणि संघटनेचे मावळते सेक्रेटरी कॉ.दत्तात्रय चव्हाण यांनी पुढील टर्मसाठी कॉ.किरण नाझीरकर यांची सेक्रेटरी तसेच कॉ.भगवान गायकवाड यांची खजिनदार, कॉ.संजय वाघमोडे, कॉ.स्वप्नील भोसले व कॉ.शशीकांत देवकाते याची ज्वाईंट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला. उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी एकमताने हा प्रस्ताव गगनभेदी आवाजात मंजूर केला.
त्यानंतर कॉ.बाजीराव बोडरे यांनी
कॉ. दत्ता चव्हाण
कॉ. मनोज वाघमारे
कॉ. मनोज काळोखे
कॉ. रोहित कुंभार
कॉ. संदीप नलावडे
कॉ. प्रमोद माने
कॉ. धनंजय विष्णूप्रद
कॉ. बाजीराव बोडरे
कॉ. अर्जुन भोसले
कॉ.निलेश काकडे
कॉ. प्रथमेश काशीद यांची कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती चा प्रस्ताव मांडला ज्याला उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गडगडाटासह एकमताने पारित केला.
यानंतर सर्वांनी नवनियुक्त युनीट सेक्रेटरी कॉ. किरण नाझीरकर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनियुक्त ज्वाईंट सेक्रेटरी कॉ.स्वप्नील भोसले यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सर्वांचे आभार मानले व आपला बहुमोल वेळ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे व आदराचे आम्ही ऋणी आहे असे सांगितले, वैद्यकीय प्रतीनीधी ची कोणत्याही प्रकारची समस्या आमच्यासाठी आव्हान बनणार नाही याची संघटनेच्या वतीने मी सर्वांना ग्वाही देतो असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment