बारामती नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..(भाग 1) - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 13, 2024

बारामती नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..(भाग 1)

बारामती नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर*..(भाग 1)
बारामती:-बारामती म्हंटले की विकासाची गंगा असणारे गाव याच गावात शहरात नावाजलेली जुन्या काळातील बारामती नगर परिषद आज भव्य अशी विकसित सर्व सोयीयुक्त अशी इमारत उभी आहे ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यातून पण याच इमारतीत काम करणारे अधिकारी किती चोक काम करतात याचे अनेक उदाहरणे आहेत, मागील काही वर्षांपूर्वी याच नगरपालिकेत मोठी चोरी झाली अद्यापही यातील आरोपी सापडले नाही या मागे काय गौडबंगाल आहे हे आजही बारामतीकराच्या मनामध्ये शंका निर्माण होताना दिसत आहे, तर गेली कित्येक वर्षे झाली बारामतीच्या नगरपरिषद निवडणूका झाल्या नसल्याने मुख्याधिकारी हेच प्रशासक आहेत.सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जाताना किती अडचण येतंय हे पुढील अंकात सविस्तर मांडणार आहोत परंतु आजची परिस्थिती अशी आहे की, बारामती नगरपरिषदेचा कारभार कुणाच्या इशाऱ्यावर चालत आहेत हे सर्वज्ञात असताना मात्र चुकीच्या कामांना पाठीशी घालण्याचे काम सद्या चालू आहे. काही खात्याचे प्रमुख आपल्या खात्याची जबाबदारी नीट सांभाळत नसून तो कुणा भलत्याच ऐकत असल्याचे दिसत आहे, कर्तव्यात कसूर करणारे व त्यांना जाणून बुजून पाठीशी घालणारे सारखेच म्हणावे लागेल, सततचे होत असलेले बारामती नगरपरिषदे समोरचे आंदोलन हे कर्तव्यात कसूर कामाचा पुरावा असेल असे तर नाही ना?अशी शंका निर्माण होऊ लागली असल्याने अश्या चुकीच्या व नागरिकांच्या प्रश्नांची दखल न घेतल्याच्या कारणावरून मात्र याचा फटका लोकसभेला बसला असल्याचे बोलले जात असले तरी त्याची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये याची दक्षता घेतली जाईल का?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

No comments:

Post a Comment