बारामतीत फ्लेक्स बंदी असतानाही लागले जात आहे राजरोस फ्लेक्स.. बा. न. प. चा भोंगळ कारभार.(भाग 3)
बारामती:-नुकताच काही महिन्यांपूर्वी बारामती नगरपरिषदेने फ्लेक्स बंदी संदर्भात ठराव केला तसे प्रसिद्धीही दिली परंतु काही दिवसही उलटले नाहीत तोपर्यंत बारामतीत सर्रास राजकीय, सामाजिक फ्लेक्स लावले जात आहे.याकडे मात्र बारामती नगरपरिषदेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.सध्या नगरपरिषदेवर प्रशासक असताना सुद्धा बारामती नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान करण्यामध्ये अधिकारी तरबेज झाले असल्याचे दिसत असल्याची सद्या चर्चा जोरात चालू आहे,बारामती नगरपरिषदेत
यापुर्वी कोणी विनापरवाना फ्लेक लावल्यास
त्याच्यावर मालमत्ता विद्रुपण कायद्यांतर्गत कारवाई केली जात होती.यामध्ये नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले ही खूप खेदाची बाब आहे.
गणेशउत्साहात मंडळाला सुद्धा अशा कारवाईला
सामोरे जावे लागले आहे. धार्मिक कार्यात अडथळा नको म्हणणाऱ्यांनी सुद्धा त्यावेळी मंडळावर कारवाई केली.सध्या बारामतीत राजकीय पक्षाची रंगत वाढत असून लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झालेपासुन बारामतीत सर्रासपणे बेकायदेशीर,विनापरवाना फ्लेक्स लावण्याचा झपाटा सुरु झालेला आहे. बारामतीत यापुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोणी फ्लेक्स लावल्यास त्यावर कारवाई करण्यास प्रशासनाला तंबी देत होते मात्र, आता अजित पवार यांच्या कार्यक्रमाचे व पक्षातील पदाधिकाऱ्यांचे वाढदिवसाचे बेकायदेशीर फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. यावर नगरपरिषदेचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत असतील तर शासनाचे अधिकारीच बारामती नगरपरिषदेची महसुली तोटा करीत आहेत.याबाबत विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांनी लेखी, तोंडी तक्रारी माहिती अधिकार कायद्यात
माहितीची मागणी केलेली असताना सुद्धा अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.तर संबंधित खात्याचे प्रमुख मुख्याधिकारी यांना अधिकार आहे असे म्हणून सर्व मुख्याधिकारी यांच्यावर सोपवून मोकळे होत आहे, मात्र गेले काही दिवस मुख्याधिकारी रजेवर आहेत त्यामुळे कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे, याबाबत बेकायदेशीर,विनापरवाना लावण्यात आलेल्या फ्लेक्सच्या व नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मे. कोर्टात दाद मागणार असणार असल्याचे समजतंय.
No comments:
Post a Comment