बारामतीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना धरले वेठीस?पहाटे 3 वाजल्यापासून शेकडो लाभार्थी बसून.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 23, 2024

बारामतीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना धरले वेठीस?पहाटे 3 वाजल्यापासून शेकडो लाभार्थी बसून..

बारामतीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना धरले वेठीस?पहाटे 3 वाजल्यापासून शेकडो लाभार्थी बसून..
बारामती:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत कामगार सुविधा केंद्र, बारामती याठिकाणी बांधकाम कामगारांना पेटी व भांडी असे साहित्य वाटप गेले कित्येक महिने चालू आहे की नाही याबाबत शाश्वता नाही हे सद्या च्या परिस्थिती वरून दिसून येत आहे,परंतु वाटप करण्याच्या नावाखाली किती नाहक त्रास याठिकाणी  येणाऱ्या लाभार्थ्यांना त्रास होत असल्याचे काहींनी यावेळी बोलताना नाराजीतून संताप व्यक्त करीत सांगितले,दोन तीन तालुक्यातील बांधकाम कामगारांना बारामती येथील कामगार सुविधा केंद्रासमोर भल्या पहाटे 3  वाजल्यापासून नंबर साठी व आपल्याला लवकर पेटी व भांडे मिळतील या आशेपोटी कित्येक तास बसून राहिल्याचे दिसत आहे,पाऊस चालू असताना देखील लाभार्थी बसून होते यावेळी नियोजनात सावळा गोंधळ दिसून येत होता हे याठिकाणी प्रत्यक्ष दर्शी

पाहिल्यास दिसून येईल,योजना येतात मात्र त्याचा लाभ घेताना किती नाहक त्रास लाभार्थ्यांना होतो हे दिसून येते.तर काही लाभार्थ्यांनी बोलताना सांगितले की एजंट गिरी चालू असून यामध्ये दिड,दोन हजार रुपये घेत असल्याचे कळतंय ,अश्या पद्धतीने काम होत असेल तर याला कुणाला जबाबदार धरावे अशी प्रतिक्रिया उमटत असून.हे कधी थांबेल व गरजवंत लाभार्थ्यांना किट साहित्य कधी मिळेल हे वाट पाहण्याशिवाय मार्ग नाही.मात्र कामगार सुविधा केंद्राच्या बाहेर कामगार नोंदणी साठी हजारो कामगार येतात मात्र ऑफीस मधील ऑपरेटर व कामगार वर्ग कमी असल्याने धांदल उडतीय हे दिसून येत आहे.तर फ्रॉम खाजगी ठिकाणी भरण्यासाठी जावे लागत असून त्याठिकाणी पैसे मोजावे लागत आहे.याबाबत लवकरच कामगार मंत्री व कामगार आयुक्तांना निवेदन व तक्रार देेनार आहे.

No comments:

Post a Comment