'मुख्यमंत्री माझी लाडकी योजना'चा बारामती नगरपरिषदेत स्वतंत्र कक्ष नसल्याने लाभार्थ्यांना होतोय त्रास.. बा.न.परिषदेचा भोंगळ कारभार..(भाग 4 )
बारामती:-राज्यात नव्याने महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आणली त्याअनुषंगाने विकसित बारामतीत नव्याने महिलांचे फ्रॉम भरून घेतले गेले यासाठी हजारो महिलांना होणाऱ्या व येणाऱ्या अडचणीचा सामना(कागदपत्रे गोळा करताना)करीत अखेर फ्रॉम राजकीय पक्षाच्या कार्यालयात व पदाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.परंतु हे अर्ज मुळातच बारामती नगरपालिकेकडे नेमून दिलेल्या कक्षेत भरणे गरजेचे असताना तशी सुविधा का उभारली गेली नाही दुर्दैवी आहे. महिलांना होत असलेला नाहक त्रास आपल्या प्रतिक्रियेतून देताना संताप व्यक्त करीत होते,नगरपालिकेत गेल्यावर मात्र उडवा उडवीची उत्तरे मिळत होती, तर एक खिडकी योजने सारखी कुठेही कक्ष दिसून आला नाही याबाबत माहिती घेताना अधिकारी सरळ सरळ मुख्याधिकारी यांच्याकडे बोट दाखवत असल्याचे जाणवले, मात्र ही योजना सरकारची असून ती जनतेला सोपी व्हावी यासाठी यातील किचकट अटी टाळून ती कशी सोपी होइल यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र बारामती शहरातील हद्दीतील लाडक्या बहिनीना नाहक त्रास होत असलेचे दिसत आहे,यासाठी बारामती नगर परिषदेने सर्वांना दिसावे असे स्वतंत्र कक्ष उभा करावे जेणे करून प्रभागातील, वार्डातील महिला भगिनी आपल्या योजनांचा फॉर्म आणून देतील, भरतील यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, एक गठ्ठा फ्रॉम स्वीकारले जाऊ नये प्रत्येक महिलांचा फ्रॉम समक्ष भरावा जेणे करून तो बाद होणार नाही व आलेल्या योजनेचा लाभ घेता येईल अशी मागणी होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment