खळबळजनक..बारामतीत सापडली तलावाजवळ एकाच वेळी पाच पिस्तूल..पोलीस चौकी उभा करण्याची होतेय मागणी.!
बारामती:-बारामतीत एवढी पिस्तुल सापडल्याने खळबळ उडाली असून गेल्या काही वर्षांत बारामती शहरांमध्ये पोलिसांनी अनेक युवकांकडून बेकायदा गावठी कट्टे व पिस्तूल जप्त केलेले आहेत.बाहेर राज्यातून अतिशय कमी किमतीमध्ये सहजतेने ही शस्त्रे मिळत असल्याची पोलिसांची माहिती आहे. काही एजंट या परिसरात येऊन पिस्तुलांची विक्री देखील करतात.शहरातील रिंग रोड लगत महात्मा फुले साठवण तलावानजीक पाच गंजलेल्या अवस्थेतील पिस्तूल सापडल्याने बारामतीत चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोणीतरी अज्ञात
इसमाने साठवण तलावानजीक पाच पिस्तुले
टाकून दिली असल्याची गोपनीय माहिती
पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या
ठिकाणी धाव घेतली. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व इतर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी असलेली गंजलेल्या अवस्थेतील पाच पिस्तुले ताब्यात घेतली आहेत. ही पिस्तुले नेमकी कोणी या ठिकाणी आणून टाकली व ही कोणाच्या मालकीची आहेत, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, बारामतीसारख्या विकसित शहरामध्ये अचानक एकाच वेळेस पाच पिस्तुले सापडण्याची ही घटना चिंताजनक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. गेल्या काही वर्षांत बारामती शहरांमध्ये
पोलिसांनी अनेक युवकांकडून बेकायदा गावठी
कट्टे व पिस्तूल जप्त केलेले आहेत. मध्य
प्रदेशामधून अतिशय कमी किमतीमध्ये सहजतेने
ही शस्त्रे मिळत असल्याची पोलिसांची माहिती
आहे. काही एजंट या परिसरात येऊन पिस्तुलांची
विक्री देखील करतात, अशी माहिती पोलिसांकडे
असून त्या दृष्टीने देखील तपास सुरू आहे. गोपनीय बातमीदारांमार्फत शस्त्रे बाळगण्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली
आहे. मात्र, एकाच वेळेस गंजलेल्या अवस्थेतील
पाच पिस्तुले कोणी या ठिकाणी आणून टाकून
दिली असतील, या दृष्टीने पोलिसांनी बारकाईने
तपास सुरू केला आहे. या घटनेला पोलीस
विभागाने गांभीर्याने घेतले असून त्याचा सखोल
तपास सुरू असल्याचे सांगितले.बारामती शहरातील मध्यवर्ती भागातून कॅनॉल गेल्याने कॅनॉलच्या कडेने तलावाच्यादिशेने फिरण्यासाठी वयोवृद्ध, महिला वर्ग, पुरुषमंडळी पहाटे व सायंकाळी याभागात फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात ये जा करीत असतात, अश्या वेळी देखील काही प्रेमी युगुल जोडपे तलावाच्या ठिकाणी तर काही झाडाच्या आडोश्याला चाळे करताना दिसत असतात अश्या वेळी कोणी हाटकण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येण्याचा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे, अश्या ठिकाणी पोलीस गाडीचा राउंड मारणे गरजेचं आहे आणि आत्ता तर चक्क एक दोन नव्हे तर पाच पिस्तूल सापडल्याने चांगलीच भीती नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाल्याचे चर्चा आहे. त्यातच नव्याने पोलीस स्टेशन बारामती च्या एका दिशेला असल्याने तलावासारख्या व नजीकच कॉलेज,शाळा असल्याने अश्या ठिकाणच्या जवळच एखादी छोटी पोलीस चौकी असावी जशी टी सी कॉलेज जवळ होती पण ती आत्ता बंद आहे ती चालू करावी अशी मागणी पत्रकार संतोष जाधव करणार असल्याचे सांगितले.जेणे करून टी. सी. कॉलेज परिसर,वसंतनगर, ख्रिश्चन कॉलनी, रिंग रोड नजीक वस्ती, प्रगतीनगर, तांदुळवाडी रोड,पाटस रोड व आसपासचा परिसर याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आधार वाटेल व या भागात काहीशी वाढती गुन्हेगारी कमी होईल, पोलिसांचा धाक राहील अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment