वसंतनगर सह इतर भागाकडे तीन हत्ती चौका कडून येणाऱ्या लोकांना कधी मिळणार मोकळा श्वास..का झालाय अडथळा?
बारामती(संतोष जाधव):- बारामती ही विकसित होत असल्याने अनेक मोठमोठी कामे चालू असून काही अंशी झालेली आहे,तर काही भागात विकासाच्या नावाखाली व्यावसायिकांची दुकाने जमीनदोस्त झाली असल्याची पाहायला मिळत आहे, तर काही भागात झालेल्या रस्त्याच्या दुरावस्था पाहता त्या चांगल्या प्रतीच्या होण्यासाठी सामाजिक स्थरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून रस्त्याची कामे करण्यास भाग पाडले यातील एक उदाहरण म्हणजे तिन हत्ती चौक ते टी सी कॉलेज रोड जो वसंतनगर भागाकडे जातो या रस्त्याची पूर्वी अवस्था आपण पाहिली असेल पुनावाला बागे समोर अति प्रमाणात या रस्त्यावर खड्डे पडले होते तर पुढे कॉलेज कडे जाणाऱ्या या रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे झाले होते यासाठी मी स्वतः संतोष जाधव पत्रकार यानात्याने या रस्ता दुरुस्ती साठी वेळोवेळी पाठपुरावा केला आंदोलन केले,रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन केले तेव्हा कुठे याची दखल घेऊन काही भाग सिमेंटचा व काही भाग डांबरी करण करून आज रस्ता वाहतूक व ये जा करण्यास तयार आहे, या रस्त्यावरून वसंतनगर,गौतम नगर, प्रगतीनगर, विवेकानंद नगर सह अनेक लोकवस्ती भागाकडे व विशेषतः टी सी कॉलेज, हायस्कूल,मराठी शाळा, क्लासेस,लहान मुलांचे स्कुल असअसताना ये जा करणारे विद्यार्थी, लहान मुलं व स्थानिक रहिवाशांना या रस्त्यावरून ये जा करावी लागते मुळातच झिग झ्याग पद्धतीने झालेल्या चढ उतार यामुळे वाहन चालविताना होत असलेल्या कसरतीला त्रस्त झालेले नागरिक, विद्यार्थी यांना यातून सुटका होत असताना तीन हत्ती चौकातून कॉलेज कडे(वसंतनगर कडे)एंट्री करताच पुनावाला बागेसमोर वाहनांची,गाड्याची पार्किंग, त्यातच ओव्हर लोड वाहतूक करणाऱ्या ट्रक, हायवा यांची वाहतूक यामुळे जीव मुठीत घेऊन मुलांना, वयोवृद्ध,महिला व रहिवाशांना ये जा करताना होत असलेली घुसमट कधी मोकळी होणार आहे,कधी हा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे याची तरी सद्या रहिवासी,वयोवृद्ध, महिला व विद्यार्थी वाट पाहत असली तरी विकसित बारामती मध्ये मात्र तीन हत्ती चौक लाखो रुपये खर्च करून फेल गेलेला विकास दिसत असल्याचे सर्वत्र चर्चा होत असली तरी मात्र वसंतनगर कडे जाणारा रस्ता कधी मोकळा श्वास घेईल ये येणाऱ्या काळात दिसेल.परंतु याच रस्त्यावर डीवायडर आल्याने रस्ता कमी झाला असून लगत असलेली वाहनांची पार्किंग मुळे मोठी अडचण झाली असून ये जा करणारा प्रवासी मात्र वैतागला असल्याचे दिसत आहे, मुळातच लहान असणारा रस्ता त्यातच मध्येच टाकलेला डीवायडर तसेच तीन हत्ती चौकाच्या बाजूने चढावून उतरतीला म्हणजे वसंतनगर कडे जाणारे वाहने व समोरून येणारी वाहने याची होत असलेली गर्दी पाहता किती अडचणींचा हा रस्ता होतोय हे प्रत्यक्ष दर्शी जाऊन पाहिल्यास लक्षात येईल पण आज जे काही होतेय ते मात्र या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना नक्कीच भोगावे लागत आहे.
No comments:
Post a Comment