नीरा गावच्या हद्दीत लाखो रूपयेची विदेशी दारू जप्त;राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 15, 2024

नीरा गावच्या हद्दीत लाखो रूपयेची विदेशी दारू जप्त;राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई..

नीरा गावच्या हद्दीत लाखो  रूपयेची विदेशी दारू जप्त;राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई..
 नीरा :- पुणे जिल्ह्यात अवैध दारू विक्री खुलेआम चालू असल्याचे दिसत असताना कारवाई मात्र छोट्या व्यावसायिकावरच होताना दिसत आहे, मात्र त्यांना ही दारू सप्लाय करणारे मात्र मोकाट असतात ही दारू कुठून येते कुणाला जाते याची कडक चौकशी होताना दिसत नाही यासाठी सप्लाय करणारे मूळ मालकावर कारवाई होणे गरजेचे आहे, नुकताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभाग भरारी पथकाने केलेल्या
कारवाईत नीरा गावच्या (ता. पुरंदर) हद्दीत १३ लाख ८२ हजार ४०० रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण २१ लाख ६९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नीरा- लोणंद मार्गावर नीरा येथील पालखीतळाजवळ वाहनांच्या तपासणीदरम्यान अशोक लेलॅण्ड कंपनीचे बडा दोस्त मॉडेलच्या चारचाकी टेम्पो वाहन क्र. एमएच ०३ - सीव्ही ९४६८ मध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मि.ली. क्षमतेच्या ७ हजार ६८० बाटल्या असलेले १६० खोके जप्त करण्यात आले. वाहनातील इसमांकडे वाहतुकीसंदर्भातील कोणतेही
मद्य परवानगीपत्र, परवाने अथवा कोणतीही
कागदपत्रे आढळून आली नाहीत. जप्त वाहनासोबत असलेल्या जुलवा जि. सुरत आणि दहिसर पूर्वच्या दोन इसमांना अटक करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात
आला आहे. या कारवाईत दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्ही. एम. माने आदींनी सहभाग घेतला असून पुढील तपास ए. बी. पाटील करत आहेत.

No comments:

Post a Comment