माळेगाव सह पणदरे हद्दीत चालू आहे राजरोस मटका,अवैध दारू विक्री..
बारामती:-बारामती ग्रामीण व बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांमध्ये आजही अवैध दारू विक्री कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे याचीच चर्चा चालू असून अशा ठिकाणी अवैध दारू विक्री,मटका जोरात चालू असून यामध्ये कोण किती जास्त प्रमाणात हप्ते देतोय यासाठी स्पर्धा चालू असल्याचे कळतंय. कलेक्शन गोळा करणारे एजंट(कलेक्टर)मात्र मर्जीनुसार नेमले असल्याचे नाराज असणारे दबक्या आवाजात बोलत आहेत.तर अवैध धंदेवाले मात्र सुसाट असून आमचं काहीच वाकडं होत नाही अश्या अविर्भावात फिरताना दिसत आहे.गेली दोन महिने मात्र अवैध धंदे बंद असल्याचे पोलीस सांगत असले तरी हे चुपके चुपके धंदे चालूच होते हे सर्वांनी पाहिले असेल. याबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी मात्र अश्या अवैध धंदे चालू असलेल्या हद्दीतील संबंधित दारू सप्लाय वर,चोरून चालणाऱ्या मटका, ऑनलाइन मटका,गुटखा विक्रते यांच्यावर कडक अशी कारवाई केल्याचे दिसून येत नसल्याने संशय व्यक्त होताना दिसत आहे,आपल्या परिसरात चालू असणाऱ्या अवैध धंद्याची माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आले ,असून पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment