इस्कॉन बारामतीतर्फे जगन्नाथजींची रथयात्रा संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 17, 2024

इस्कॉन बारामतीतर्फे जगन्नाथजींची रथयात्रा संपन्न..


इस्कॉन बारामतीतर्फे जगन्नाथजींची रथयात्रा संपन्न.. 
बारामती:- रविवार दि १४ जुलै रोजी अतिशय भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडला अतिशय आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बारामतीमधे सतत पावसामुळे कोणतेहि कार्यक्रम व्यवस्थित होतील की नाही. ही चिंता सर्वांनाच भेडसावणारी असते. परंतु या परिसरातील रथ मार्गावरील सर्व घरातील दुतर्फा रांगोळ्या घालणाऱ्यानाही पावसाने उघडीप देऊन सहकार्य केले आणि जगन्नाथ जिंच्या रथयात्रेनंतर सर्वजण मंदिरातून पूर्ण प्रसाद घेऊन गेल्यावरच पाऊस सुरू झाला ही परमेश्वराची कृपा म्हणावी लागेल...जगन्नाथ पुरी मधील श्री मंदिरातील अद्भुत अशा गोष्टी तर सामान्य माणसांच्या काय पण शास्त्रज्ञांच्याही विचारांना आव्हान देऊन उलगडत नाहीत उदाहरणार्थ समुद्रास लागून असलेल्या मंदिरात लाटांचा आवाज येत नाही, मंदिरावर असणारा ध्वज वाऱ्याच्या उलट्या दिशेस फडफडणे, मंदिराच्या भव्य वास्तूची सावली खाली न पडणे, २४ तास सतत भोग प्रसाद लाखो लोकांना चालू असतो, चुलीवर अनेक मडक्यांची चवड असतानाही वरच्या मडक्यातील अन्न आदी शिजणे आणि नंतर खालच्या मडक्यातील अन्न शिजणे अशा आणि अनेक अद्भुत गोष्टी ..तेथील रथयात्रेवेळी तर आपण रस्ते आणि गाड्यांचा हिशोब पाहिला तर रथयात्रेवेळी लाखो भक्त कोठून आले हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.+ बारामती मध्ये ही अतिशय शिस्तबद्ध रथयात्रेचा विलोभनीय सोहळा पहावयास मिळाला. इस्कॉन चे संस्थापक आणि आचार्य गुरु प्रभुपादांच्या शिकवणीनुसार जगातील असंख्य मंदिरांमध्ये होणारे कार्यक्रम हे भगवान श्रीकृष्णांच्या 'श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी ' च्या मार्गदर्शनामुळे सर्वांसाठी शारीरिक आणि मानसिकतेमध्ये प्रचंड सकारात्मक बदल घडवून लाखो देशी, विदेशी कुटुंबे आनंदी झाल्याचे दृश्य परिणाम आपण अनुभवत आहोत.माननीय एचडी नंददुलाल प्रभुजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे बारामती मंदिर समितीच्या कार्यकारिणीने कमी
वेळातही प्रत्यक्ष आणि ऑनलाईन मीटिंग घेऊन अनेक टीम्स ना किचन टीम डेकोरेशन टीम रथ आणणे नेणे, रांगोळी, पत्रिका वाटप, कीर्तन टीम. या आणि अशा अनेक टीम्सना त्या त्या सेवा देऊन त्या त्या भक्तांनी जीव ओतून सेवा केल्या.
अतिशय शिस्तबद्ध संपन्न झालेल्या या सोहळ्यास इस्कॉनचे आणि विविध क्षेत्रातील असंख्य लहान मोठ्या व्यक्तींनी याचा आनंद घेतला.यामध्ये इस्कॉन बारामतीचे मार्गदर्शक एचजी नंददूलाल प्रभुजी तसेच भुमिअभिलेख पुणे चे क्लास वन ऑफिसर माननीय अमर पाटील सपत्नीक, कृष्णदृष्टी हॉस्पिटलचे नेत्र तज्ञ डॉक्टर महेश काटे, प्रसिद्ध उद्योजक श्रीमान शरद भोसले, एडवोकेट सुनील पाटील, संजीव देशपांडे, योगेश सुभेदार, ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर किशोर रुपनवर, चैतन्य अकॅडमी चे आशिष खत्री
आणि वळसे पाटील, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल चे वैभव फडतरे, प्रसिद्ध उद्योजक सोमेश शर्मा, विद्या प्रतिष्ठान बारामतीचे प्राध्यापक
उदय पाटील, प्राध्यापक खेडकर, श्रीमती नीलिमा पेंढारकर अनेक मान्यवर आणि + इस्कॉन समूहाने याचा आनंद घेतला .बारामतीतील नागरिकांचा घरासमोर रांगोळ्या घालून सुवासिनींनी तबक पंचारतीने ओवाळून त्यांचा सहभाग आणि उत्साह अवर्णनीय होता. जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेचा आनंद त्यांनी बारामती शहरात अनुभवला.

No comments:

Post a Comment