विकसित बारामतीत उपनगरातील रस्त्याची दुरवस्था..सा.बां.विभागाचे व बानपची डोळे झाकून कामे.
बारामती:-देशात, राज्यात नाव गाजतेय ते दुभंगलेली राजकीय पंढरी असणारी बारामती..या बारामतीचा कायापालट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खूप कष्ट घेतले परंतु जनतेने त्यांना लोकसभा निवडणुकीत जो निकाल दिला तो खऱ्या अर्थाने चिंतन करण्यासारखा आहे, विकसित बारामतीत भला मोठा विकास दाखविला जातोय परंतु त्याच्या ऐवजी जर बारामती शहरातील उपनगरातील झालेल्या रस्त्याच्या कामासाठी काही अंशी निधी दिला असता तर आज हे रस्ते खड्डेमय दिसले नसते व नागरिकांची नाराजी दूर झाली असती पण असं झालं नाही कारण सार्वजनिक बांधकाम विभाग व बारामती नगर परिषदेचे अधिकारी एकमेकांवर टोलवत आहे, निधी नाही त्यामुळे कामे होऊ शकत नाही अशी उत्तरे मिळत आहेत, मुळातच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भेटत नाही भेटलेच तर त्यांच्या कार्यालया बाहेर मलिदा गॅंग किंवा ठेकेदार जास्त असतात त्यामुळे अधिकारी यांना भेटण्यासाठी वेळ नसतो,अश्या मुळे नागरिकांनी तक्रारी व आपले म्हणणं कुणाकडे मांडायचे हा प्रश्न पडतो.बारामतीतील नवज्योत महिला सोसायटी च्या रस्त्याची दुरवस्था गेली अनेक महिन्यापासून झालेली आहे, गटाराचे व पावसाचे पाणी साचले जाते यामुळे अनेकवेळा वयोवृद्ध चालताना यामध्ये पडले असल्याचे सांगण्यात आले, याकडे लक्ष जाईल का अशी मागणी होत आहे, तर काही महिन्यांपूर्वी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी वसंतनगर येथील छोट्या रस्त्याचा काहीसा भाग तात्काळ या ठिकाणी रस्ता करून घ्या म्हणून संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या होत्या पण तिथेही टोलवाटोलवी चालू आहे, निधी नाही असे सांगितले जाते, लवकरच होईल असे म्हणून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार चालू आहे. तर भिगवण चौक ते एम आय डी सी रोडच्या लगत सुशोभिकरण करण्याचा नावाखाली करोडो रुपये खर्च होतोय पण हे काम करीत असताना वारंवार कामाची तोडफोड होताना दिसतेय यामध्ये लाखो रुपये मात्र वाया जात नसतील का हा प्रश्न नक्कीच नागरिकांना पडला असेल.मग छोटे रस्त्याची दुरुस्ती करायला यांच्याकडे निधी नाही म्हणून अनेक रस्ते चिखलमय व खड्डेयुक्त आहेत हे बारामती तील काही भागात आजही पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment