बारामती मेडिकल कॉलेज मधील एम.बी.बी.एस चे विद्यार्थी आणि स्थानिक तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी..
एम.बी.बी.एस चे विद्यार्थी आणि स्थानिक
तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.अब्दुल मुकीम खान (सध्या रा. बारामती मेडिकल कॉलेज,
मूळ रा. घाटकोपर मुंबई) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून जयशंकर जयसिंग गरड (रा. बारामती, मूळ फलटण)यांच्यासह सात जनावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बारामती
मेडिकल कॉलेज होस्टेलच्या पाठीमागील तळ्याजवळ चहाच्या स्टॉलवर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी अब्दुल खान आणि त्याचे मित्र सुनील शंकर सिंह महतो, शफिक मोहम्मद रफीक, उस्ता शशिकांत राधेश्याम चौरासिया,यातिक सतीश तवर हे सर्व जण कॉलेजच्या होस्टेलच्या पाठीमागील तळ्याजवळ चहाच्या स्टॉलवर जात असताना
आरोपी जयशंकर गरड आणि त्याचे इतर अनोळखी मित्र त्यांच्याजवळ आले. फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली.फिर्यादीने याचा जाब विचारला असता त्यातील एकाने दगड फिर्यादीच्या डोक्यात व कानामागील बाजूस मारून जखमी केले. यावेळी आरोपी सोबत आणखी चार ते पाचजण आले आणि त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ,दमदाटी केली. यातील जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामती पोलिसांनी यातील आरोपी
गरड याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे. आरोपी जयशंकर गरड याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो व त्याचा मित्र ओंकार आणि त्याचे चार मित्र कॉलेजच्या पाठीमागील तलावाशेजारी बसले होते. त्यावेळी तेथे काही मुले देखील होती. त्यातील काही मुलांची भांडणे चालू होती.त्यामुळे मी तेथे त्यांना विचारपूस करत असताना त्यातील एका मुलाने मला मारले त्यामुळे मी खाली पडलो.त्यावेळी त्याच्या सोबत असणाऱ्या अनोळखी चार मुलांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी त्यातील एकाने बूटाने माझे डाव्या डोळ्याजवळ तसेच डाव्या हाताच्या खांद्यावर मारले. यानंतर मला तेथील अज्ञात व्यक्तीने रुग्णालयात दाखल केले, असे फिर्यादीने म्हटले आहे.बारामती पोलिसांनी यातील आरोपी
गरड याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment