बारामतीत उद्या कुस्त्यांचं मैदान; युवा नेते जयदादा पवार यांच्या पुढाकारातून मैदानाचं आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 27, 2024

बारामतीत उद्या कुस्त्यांचं मैदान; युवा नेते जयदादा पवार यांच्या पुढाकारातून मैदानाचं आयोजन..

बारामतीत उद्या कुस्त्यांचं मैदान; युवा नेते जयदादा पवार यांच्या पुढाकारातून मैदानाचं आयोजन.. 
बारामती : (प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्या 65 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामती तालूका कुस्तीगीर संघाच्या वतीने ऱविवार दि. २८ जुलै रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे मैदानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जयदादा पवार यांनी दिली.अजितदादा पवार यांनी आजवर कुस्ती आणि कुस्तीगीर यांच्यावर प्रेम केले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील महान मल्लाच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये दुपारी १ वाजता होणाऱ्या या मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माउली कोकाटे यांची होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी माउली जमदाडे विरुद्ध महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख यांची होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध गणेश जगताप यांची होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती मुंबई महापौर केसरी भारत मदने विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी योगेश जगताप यांची होणार आहे.

या मैदानावर जवळपास शंभर मल्लाच्यात कुस्त्या होणार आहेत. या मैदानास आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, गिता फोगट, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख आदी कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मैदानास कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खासदार सुनेत्राताई पवार, आमदार सुनीलअण्णा शेळके, आमदार दत्तात्रय मामा भरणे उपस्थित राहणार आहेत. 

या कुस्ती मैदानावर नॅशनल खेळाडू सोनाली मंडलिक विरुद्ध अमृता पुजारी यांच्यात लढत होणार आहे.

या कुस्ती मैदानास महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल उपस्थित राहणार आहेत तरी कुस्तीशौकीनानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस शिवाजीराव काळे, जंगल वाघ, दिलीप काटे, संतोष टाटीया, सुधाकर माने, पोपटराव गावडे, उत्कर्ष काळे, महेश देवकाते, धैर्यशील काळे, ऋषी गावडे, अमोल पवार, निलेश जगदाळे, गितेश पलंगे, ओम टाटीया आदी बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment