चाराण्याची कोंबडी,बाराण्याचा मसाला.!देवाच्या दारात सक्तीने वसुली कशाला.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 28, 2024

चाराण्याची कोंबडी,बाराण्याचा मसाला.!देवाच्या दारात सक्तीने वसुली कशाला.!!

चाराण्याची कोंबडी,बाराण्याचा मसाला.!देवाच्या दारात सक्तीने वसुली कशाला.!!
बारामती:-सद्या आखाड जोरात चालू असून सगळीकडे यात्रा चालू असून या ठिकाणी कोंबडा - बोकड कापण्याचा सद्या जोर वाढलाय मुळातच ही प्रथा केव्हा बंद होईल हे सांगू शकत नसले तरी ही सरार्स चालू असून कदाचित ती भक्ती असावी, परंतु अश्या यात्रे च्या ठिकाणी कोंबड-बकरे कापण्यासाठी जो धंदा झालाय सक्त वसुलीचा तो असल्याने संताप व्यक्त होताना दिसत होता,लांबून लांबून आले भाविक अश्या प्रकारामुळे नाराज झाले असल्याचे दिसत होते, मग ते बारामतीतील माळेगाव रोड च्या लगत असणारे म्हसोबा मंदिर असो किंवा इतर ठिकाणचे देवस्थान असो याठिकाणी होत असलेली कोंबडा व बकरे कापणाऱ्या कडून सक्त वसुली असो नाईलाजाने ज्यादा पैसे द्यावे लागत असल्याने नाराजी पसरली. तर होळ येथील ढगाई  मंदिर परिसरात सद्या यात्रा चालू असून भक्त भाविक लांबून या ठिकाणी भक्ती भावाने व श्रद्धने येत असतात व ते आपल्या स्वइच्छेने खर्च करतात व देणगी देत असतात यामुळे कदाचित यावेळी ते यात्रेकरूंनी स्वखुशीने देणगी दिल्यावर ती स्वीकारायची असा ग्रामपंचायतीचा ठराव झाला परंतु बोकड-कोंबडं कापण्यासाठी ग्रामपंचायतची 100+20 अशी सक्तीने पावती घेतली जाते याबाबत ग्रामपंचायतीचा ठराव झालेला नसल्याचे कळत आहे, तसेच कापणारा 250+50 असे पैसे घेतले जातात आणि तुकडे करणारा 250 घेतो म्हणजे ऐका यात्रेकरुला भाविकाला अंदाजे 650 रु. इतका खर्च बोकडा व्यतिरिक्त पडत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली,परंतु देव देव करताना देवाच्या दारात कशाला वाद करायचा या भावनीकतेतून कोणी पुढे येत नाही याचा फायदा घेतला जाऊ नये जे उद्दिष्टे साधत काम करायचं आहे त्यासाठी नक्कीच भाविक स्वखुशीने मदत व देणगी देतील व देत आले आहे.अश्या वेळी असे प्रकार घडू नये अशी भाविकांनी नाराजी व्यक्त करताना बोलून दाखविले.

No comments:

Post a Comment