साथीच्या रोगांवर उपाययोजना करून संरक्षण करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा - मंगलदास निकाळजे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 12, 2024

साथीच्या रोगांवर उपाययोजना करून संरक्षण करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा - मंगलदास निकाळजे

साथीच्या रोगांवर उपाययोजना करून संरक्षण करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा - मंगलदास निकाळजे 
बारामती:- बारामती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे अनेक दिवसांपासून नागरीक आजारी पडत आहेत अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत या रुग्णांमध्ये डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, हिवताप, गोचीड ताप, संसर्गजन्य रोग,  अशा प्रकारच्या साथीचे रोग रुग्णांमध्ये आढळत आहेत बारामती शहरांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण वाढत चाललेले आहे त्यामुळे या रोगांचे देखील प्रमाण वाढत चालले आहे मुख्यतः दलित वस्त्यांच्या अवस्था बिकट आहे दलित वस्त्यांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे दलित वस्त्यांमधील अस्वच्छतेमुळे या ठिकाणी मच्छरांचे प्रमाण जास्त आहे संडासाची अवस्था अस्वच्छ असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे यामुळे अनेक नागरिकांना संसर्ग होऊन नागरिक व लहान लहान मुले गंभीर प्रमाणात आजारी पडत आहेत या वस्त्यांमध्ये असणारी गटारी सातत्याने तुंबत असल्यामुळे गटारीतील अस्वच्छ पाणी बाहेर येऊन नागरिकांच्या दारात तसेच घरामध्ये शिरत असते आणि याच गटारीच्या पाण्यामध्ये लहान लहान मुलं खेळून आजारी पडत असतात तसेच या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना देखील गंभीर स्वरूपाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे तसेच नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्यामध्ये सतत बदल होत असल्याने कधी पाणी गढूळ येत आहे तर कधी पाण्याचा वास येत आहे, आणि पाणी भरून हंड्यात दोन दिवस न हलवता ठेवले की त्याच्यामध्ये खाली शारचा गाळ साचत आहे आणि त्यामुळे किडनी स्टोन (मुतखडा), पोटाचे विकार, आतड्यांवर सूज येणे अशाप्रकारचे अनेक रोग निर्माण होऊन नागरिक आजारी पडत आहेत याचा गंभीरपूर्वक विचार करून बारामती शहरावर साथीच्या रोगांचे खूप मोठ्या प्रमाणात संकट येण्याआधी सर्व प्रकारच्या साथीच्या रोगांपासून संरक्षणाच्या उपाययोजना युद्ध पातळीवर  करावे यामध्ये धूर फवारणी, जंतुनाशक फवारणी, सर्व ठिकाणी स्वच्छता करणे, विशेष दलित वस्त्यांची  स्वच्छता करणे, जंतुनाशक पावडर फवारणी करणे, संडासाची वेळेवर स्वच्छता करणे, संडासा मधल्या पाण्यामध्ये जंतुनाशक पावडर टाकणे, संडासची वारंवार तपासणी करणे, संडास मधून दुर्गंध येणार नाही यावर उपाययोजना करणे, व इतर प्रकारच्या उपायोजना करून नागरिकांना साथीच्या रोगापासून वाचवने व जनजागृती करणे, नागरिकांवर मोफत उपचार करणे, 
  तसेच नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची तपासणी करून सतत पाण्यात बदल होणार नाही, पाण्याचा वास येणार नाही, नागरिकांना शारयुक्त पाणी पाजले जाणार नाही  याची दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना राबवण्याबाबत सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना सूचित करून तसे आदेश काढावेत, व नागरिकांना  स्वच्छ पाणी पुरवावे कारण पाण्यापासून सर्वात जास्त आजार होतात या साठी पाण्यावरती जास्त काम करून नागरिकांना पिण्याचे पाणी स्वच्छ पुरवले जावे 
  तसेच बारामती शहरात खूप मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे ही कुत्री मोठ्या संख्येने गोळा होऊन नागरिकांच्या अंगावर जातात व नागरिकांना चावा घेतात लहान लहान मुलांना देखील चावा घेतात ही भटकी कुत्रे असल्याने त्याचे इन्फेक्शन होऊन नागरिकांना रॅबिट सारखे आजार होऊ शकतात त्यामुळे या भटक्या कुत्र्यांना त्वरित पकडून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास भाऊ निकाळजे यांनी केली 
   या मागण्यांवर येत्या सात दिवसात उपायोजना मोठ्या झपाट्याने राबवल्या नाही तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा पवित्रा घेऊन आगळे वेगळे स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती निकाळजे यांनी दिली यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी बारामती तालुका अध्यक्ष अनुप मोरे, शहर सचिव विनय दामोदरे, कार्तिक भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment