बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत राजरोस अवैध धंदे.!पाठिशी कोण घालतय बंधे..!!
बारामती:-वाढत असलेले अवैध धंदे व त्यातून वाढत चाललेली गुन्हेगारी ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे याबाबत गृहमंत्री लक्ष देतील का?अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहे,गेल्या काही महिण्यापासून महिला व मुली सुरक्षित नसल्याचे बातम्या प्रसिद्ध झाल्या अजून किती अश्या घटना घडणार आहे, मुळातच अवैध धंदे करणारे यांची संख्या वाढत असून याठिकाणी असणारे पोलीस अधिकारी सक्षम नसल्याचे बोललं जातंय, ग्रामीण हद्दीत अनेक गावांत आजही अवैध दारू, मटका, गुटखा विक्री आजही राजरोस चालू असल्याचे सांगण्यात येत असले तरी मात्र कारवाई होताना दिसत नाही यामुळे अवैध धंदे करणारे व त्याला पाठीशी घालणारे यांच्यात आर्थिक देवाण घेवाण चालू असल्याने हे धंदे चालू आहे अशी प्रतिक्रिया उमटत आहे.याबाबत महिला संघटना लवकरच निवेदन देऊन उपोषण करणार असल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment