सहाय्यक अभियंत्याने केली सारिका खलसे या महिलेस ऑक्सीजन मशीनची मदत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 20, 2024

सहाय्यक अभियंत्याने केली सारिका खलसे या महिलेस ऑक्सीजन मशीनची मदत..

सहाय्यक अभियंत्याने केली सारिका खलसे या महिलेस ऑक्सीजन मशीनची मदत..
बारामती:-बारामती येथील सारिका खलसे या महिलेला छातीमध्ये गंभीर स्वरूपाचे इन्फेक्शन झाल्याने ससून येथे दोन महिने ऍडमिट करण्यात आले होते परंतु इन्फेक्शन जास्त असल्याने श्वास नलिका डॅमेज झाली असल्याने नैसर्गिक श्वास घेता येत नव्हता तिला कृत्रिम श्वास घ्यावा लागत होता यासाठी ऑक्सीजन मशीनची आवश्यकता होती सदरचे कुटुंब गरीब असल्याने व घरची परिस्थिती हालाकीच असल्याने ही मशीन ते घेऊ शकत नव्हते या महिलेचे पती चंदन खलसे आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावाधाव करत होते हे कळतच वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी पोस्ट तयार करून सोशल मीडिया वरती सर्व नागरिकांना खलसे कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अनेक नागरिकांनी या कुटुंबाला आपापल्या परीने मदत केली. तसेच या आव्हानाची पोस्ट पाहून महावितरणचे सहाय्यक अभियंता नितीन मोहन झारगड साहेब हे धावून आले व कोणताही विचार न करता आपल्याकडे असणारी ऑक्सिजन मशीन देण्यासाठी स्वतःहून संपर्क केला माझ्याकडे ही मशीन आहे मी ती देतो. तुम्हाला जोपर्यंत वापरायचे आहे तोपर्यंत वापरा आणि तुमचे पेशंट बरे झाल्यानंतर इतर कोणाला त्याची गरज लागली तर त्यांनाही ती मशीन द्या असे सांगितलं व ऑक्सिजन मशीन लगेच आणून सारिका खलसेचे पती चंदन खलसे व जिल्हाध्यक्ष  मंगलदास निकाळजे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी माणसामधील माणुसकी जाणणारे अधिकारी पाहायला मिळाले मशीन सुपूर्त करताना वायरमन सिद्धार्थ जठार, विठ्ठल गावडे, शहर सचिव विनय दामोदरे, करण सोनवणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment