बारामतीत पालखी सोहळा मार्गावर रस्त्यात अडथळा निर्माण होऊ नये या साठी दिल्या सूचना..डीजे व कमानी लावण्यास बंदी.!
पालखी मार्गावर शहरात गतवर्षी अनधिकृत डीजे
आणि कमानींमुळे अडथळा निर्माण झाल्याच्या
पार्श्वभूमीवर अनधिकृत डीजे व कमानी व स्टेज लावू नये, परवानगीशिवाय डीजे व कमानी लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,तसेच रस्त्यावर स्टेज येऊ नये असे आवाहन
पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी
मार्गावर बारामती शहरात गतवर्षी अनधिकृत डीजे व कमानी उभारल्यामुळे पालखी विश्वस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यावर्षी संत तुकाराम महाराज पालखी शहरात ६ व ७ जुलै रोजी असणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पालखी मार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या अनाधिकृत कमानी व विनापरवाना डीजे उभे करू नये.तसेच रस्त्यावर स्टेज उभारू नये तसेच विनापरवानगीशिवाय डीजे लावणाऱ्यास डीजे
मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
तसेच नियमांचे पालन करून लावावेत, असे
No comments:
Post a Comment