खळबळजनक...मटणाच्या नावाखाली चक्क कुत्र्याच्या मांसाची विक्री?;तपासणी अहवालाकडं सर्वांचं लक्ष.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 27, 2024

खळबळजनक...मटणाच्या नावाखाली चक्क कुत्र्याच्या मांसाची विक्री?;तपासणी अहवालाकडं सर्वांचं लक्ष..

खळबळजनक...मटणाच्या नावाखाली चक्क कुत्र्याच्या मांसाची विक्री?;तपासणी
 अहवालाकडं सर्वांचं लक्ष..
बेंगळुरू:-सद्या बोकडाच्या मटणाचे भाव भरपूर वाढले असून सद्या हॉटेल, ढाब्यावर मटण खाण्यासाठी ग्राहक जेवण्यासाठी जातो मात्र त्याठिकाणी असलेले मटन हे खात्रीलायक आहे का?हे पाहिले जात नाही मात्र नंतर याचा खुलासा होतो नुकताच मटणाच्या नावाखाली भलत्याच प्रकारचे मांस येत असल्याच्या तक्रारीची अन्न सुरक्षा व मानके विभागानं गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारीनंतर केलेल्या कारवाईत शुक्रवारी रात्री मांसाचे नमुने गोळा करण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.केएसआर रेल्वे स्थानकावर मटणाच्या नावाखाली कुत्र्याचे मांस पुरविलं जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केल्यामुळं चांगलाच गोंधळ उडाला. जयपूरहून जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेसनं हे मांसाचे डबे आणले जात होते,
असा आरोप त्यांनी केला. मात्र, विक्रेत्यानं हे आरोप फेटाळले आहेत. आम्ही गेल्या १२ वर्षांपासून हा व्यवसाय करत आहोत.आम्ही जे विकतो ते मटणच आहे, दुसरं कुठलंही मांस नाही, असं त्यानं स्पष्ट केलं आहे.मांस प्राण्याचंच, पण कोणत्या?हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथं चौकशी केली
असता राजस्थानहून रेल्वेद्वारे येणारे पार्सल स्थानकाच्या बाहेरील आवारात वाहनात भरलं जात असल्याचं तपासणी दरम्यान आढळून आलं. यातील ९० पार्सलची तपासणी केली असता त्यात जनावरांचं मांस असल्याचं आढळून
आलं. या मांसाचे नमुने गोळा करून ते नेमकं कोणत्या प्राण्याचं आहे याची माहिती घेण्यासाठी ते अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आलं.कडक कारवाई होणार? मटणामध्ये इतर कुठलंही मांस मिसळल्याचं आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासनही
अन्न आयुक्तांनी दिलं आहे. लॅबच्या तपासणी अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. पार्सल पाठवणारे आणि घेणारे यांच्या एफएसएसएआयच्या परवान्यांची सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. त्यात
काही त्रुटी आढळल्यास कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.बेंगुळरूकरांमध्ये भीतीचं वातावरण
मटणाऐवजी कुत्र्याचं मटण दिलं जात असल्याच्या बातमीनंतर बेंगळुरूतील मांसप्रेमींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै
यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे.

No comments:

Post a Comment