धक्कादायक..बारामतीत वाशिंग सेंटरवर हातात वाशिंग मशीनची गण धरून काम करताना युवकाचा मृत्यु..अचानक झालेला मृत्यू संशयास्पद?
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशनला नुकताच आलेल्या खबरी खबर देणार साहिल शब्बीर सय्यद वय 24 वर्षे धंदा खाजगी नोकरी रा. संघवीपार्क यांनी दिलेल्या खबरीवरून दिनांक 18/07/2024 रोजी दुपारी 4/30 वा. चे सुमारास टाटा शोरूम फलटण रोड बारामती येथे घडलेल्या घटनेची खबर देणार यांनी खबर दिल्याने,बारामती शहर पोलीस स्टेशन अकस्मात मयत-रजि नं 65/2024 BNNS 194 प्रमाणे नोंद केली असून याबाबत सविस्तरपणे असे की,दिनांक 18/07/2024 रोजी दुपारी 4/30 वा.चे सुमारास मी नेहमी प्रमाणे टाटा शोरूम फलटण रोड बारामती येथे वॉशिग सेन्टरमध्ये कामाला असताना आमच्याकडे दोन दिवसापासुन ट्रायल बेसवर काम करणारा सचिन दादासो कुंभार वय 18 वर्षे रा तांदुळवाडी ता. बारामती जि पुणे हा वाशीग मशीनची गन हातात घेवुन उभा असताना त्यास अचानक चक्कर आल्याने तो खाली पडला त्यावेळी आम्ही बाजुला वाशीनचे काम करणारे सर्वजन पळत त्याचेजवळ जावुन त्यास उचलुन लगेच शोरुमधील एका कारमधुन डॉ.भोईटे यांचे बारामती येथील हॉस्पीटलमध्ये औषधउपचार करणेकामी घेवुन गेलो परतु डॉ.यांनी तपासणी करुन त्यास सि.ज्यु. हॉस्पीटल बारामती येथे घेवुन जाण्यासाठी आम्ही सचिन दादासो कुंभार यास सि. ज्यु. हॉस्पीटल बारामती येथे घेवून गेल्यानंतर तेथील डॉक्टर यांनी सचिन दादासो कुंभार यास तपासुन औषधोपचारपूर्वी मयत झाला असल्याचे सांगितले. याबाबत गुन्हा दाखल अमंलदार-सफौज काळे यांनी केला असून अंमलदार पो ना वीर तपास करीत आहे अशी प्रभारी अधिकारी- पो नि घोळवे यांनी माहिती दिली.
*मात्र बारामतीत युवकाचा काम करीत असताना अचानक मृत्यू झाल्याने नक्की हा मृत्यू करंट लागल्याने झाला की चक्कर आल्याने झाला याबाबत बारामतीत उलटसुलट चर्चेला उधाण आले असून प्रकरण तर दडपले जात नाही ना?अशी शंका व्यक्त होताना दिसत आहे,यामागे काय सत्यता आहे हे शोधणे गरजेचे असून मुलगा हा 18 वर्षाचाच होता की अल्पवयीन होता हे लवकरच कळेल पण मृत्यू चे कारण काय?अशी तरी सद्या चालू आहे.*
No comments:
Post a Comment