पोलीस उपनिरीक्षकाला एका अवैध मद्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यासोबत पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करणं चांगलेच पडलं महागात..
साजरा करावा, असा आदेश असताना नुकताच नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला एका अवैध मद्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यासोबत पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करणं चांगलेच महागात पडले आहे. वणी पोलीस ठाण्यातील या वाढदिवस सेलिब्रेशनची जी चर्चा रंगली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला नियंत्रण कक्षात पाठवलं आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला. या
वाढदिवसाला अवैध मद्य विक्री करणारे व पुरवठा करणारे हे देखील उपस्थित होते. यातील काही जणांवर मद्य विक्री तसेच तस्करीबाबतचे गुन्हे दाखल आहेत.या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वरिष्ठांकडून या फोटोची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक कोठावळे यांना नियंत्रण कक्षात पाठवलं आहे.
दरम्यान, वाढदिवस ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलीस ठाण्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच
साजरा करावा, असा आदेश तत्कालीन
नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिला
होते. मात्र या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत पोलीस ठाण्यातच पोलीस उपनिक्षकाचा
वाढदिवस साजरा झाला.या वाढदिवसाला मद्य विक्रेते व पुरवठादार हजर राहिल्याने हा वाढदिवस पोलीस उपनिरीक्षकाला चांगलाच भोवला आहे. वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वरिष्ठांनी कोठावळे यांच्यावर कारवाई करून त्यांना नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment