मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना'चे 'नारीशक्ती दूत' ॲप वरुन लाखो लाडक्या बहिणी घरी बसूनच भरताहेत अर्ज...
पुणे:- 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेच्या पूर्वीच्या शासन निर्णयात बदल करून लाभार्थी महिलांना दाखले काढण्यासाठी हेलपाटे मारायला लागू नयेत,यासाठी 'नारीशक्ती दूत' ॲप द्वारे अर्ज भरता येत असल्याने अनेकजण 'नारीशक्ती दूत' ॲपऐवजी ऑफलाइनच अर्ज करीत आहेत. त्या लाभार्थी महिलांना
त्यांचा अर्ज ऑनलाइन अपलोड करताना पुन्हा हेलपाटा मारावा लागणार आहे.योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मिळणार असल्याने
अनेक महिलांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. पण,सद्या अर्ज केवळ अंगणवाड्यांमध्येच स्वीकारले जात आहेत. बहुतेक महिला अशिक्षित असून त्यांच्याकडे अॅन्ड्राईड मोबाईल नाहीत. त्यामुळे त्या महिला ऑफलाइन अर्ज भरून अंगणवाड्यांमध्ये देत आहेत. आता दिवसेंदिवस अर्जांची संख्या वाढणार आहे.ऑफलाइन अर्ज अंगणवाडी सेविकांना ते सबमिट केल्यावर ओटीपी येईल, तो त्याठिकाणी टाका म्हणजे तुमचे प्रोफाइल तयार होईल-प्रोफाइल तयार झाल्यावर खालील बाजूला नारीशक्ती दूत, योजना, यापूर्वी केलेले अर्ज व प्रोफाइल असे पर्याय आहेत, त्यापैकी 'नारीशक्ती दूत'वर-त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
हा पर्याय दिसेल आणि तो उघडून त्यावरील माहिती भरा- अर्जातील संपूर्ण वैयक्तिक माहिती भरल्यावर आधारकार्ड, रहिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड अपलोड करावे लागेल. शेवटी अर्जदाराचे हमीपत्र देखील अपलोड करावे लागणार असून त्यासाठी हमीपत्र डाऊनलोड करून ते भरून ठेवा म्हणजे त्याचा फोटो अपलोड करता येईल.-सर्वात शेवटी फोटोचा पर्याय असून आपला स्वत:चा (लाभार्थी महिला) फोटो काढून त्यावर अपलोड करून अर्ज सबमिट करा आणि त्याचा स्क्रिन शॉट काढून ठेवा त्यानंतर समित्या नेमल्यावरच अर्जांची पडताळणी योजनेच्या शासन निर्णयातील बदलानुसार तालुका स्तरावरही समित्या नेमल्या जाणार आहेत. त्या समितीचे अध्यक्ष व दोन सदस्य अशासकीय असणार आहेत. त्यांची नावे कोणाकडून घ्यायची दरम्यान, प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन झाल्याशिवाय अर्जांची पडताळणी अशक्यच आहे.
No comments:
Post a Comment