मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती विमानतळ येथे स्वागत* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 16, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती विमानतळ येथे स्वागत*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती विमानतळ येथे स्वागत*
बारामती, दि.१६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती येथील विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले. 

यावेळी आमदार राहुल कुल, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तानाजी बरडे, तहसीलदार गणेश शिंदे आदी उपस्थित होते. 

आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे कुटुंबीयांसह बारामती विमानतळ येथून वाहनाने पंढरपूरकडे प्रयाण झाले.

No comments:

Post a Comment