संत सोपान काका पालखीचे माळेगांव रोड हनुमान नगर येथे महिला बचत गटाने वारकरी माऊलींचे केले होते सहर्ष स्वागत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 12, 2024

संत सोपान काका पालखीचे माळेगांव रोड हनुमान नगर येथे महिला बचत गटाने वारकरी माऊलींचे केले होते सहर्ष स्वागत..

संत सोपान काका पालखीचे माळेगांव रोड  हनुमान नगर येथे महिला बचत गटाने वारकरी माऊलींचे केले होते सहर्ष स्वागत..
बारामती:- मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी संत सोपानकाका पालखीचे बारामती मध्ये आगमन झाले हनुमान नगर महिला बचत गट ग्रुप गेले सात वर्षापासून देशी झाडाच्या बिया संकलित करून सिड बॉल बनवतात आणि वारकरी माऊलीकडे रस्त्याने टाकण्यास देतात. 
7000 हजार सीटबॉल तयार कलेआणि पाच हजार बिया पॅकिंग करून चिवडा पॅकिंग करून पंढरीची वाट पायी चालणाऱ्या माऊलीना दिले जाते.. जुन जूलै मध्ये महिला बचत गटाच्या वतीने परिसरात वृक्षारोपण केले जाते. आजपर्यंत 10,000 रोपे लावली गेली.काही वर्षांपूर्वी परिसरात लावलेली देशी झाडे आज बीज माता झाल्याआहेत त्यांच्या बिया संकलित करून सीड बॉल तयार करुन हा उपक्रम राबवला जातो.
झाडे लावू झाडे जगवू पर्यावरणाचे रक्षण करून. हा संदेश महिलांच्या वतीने दिला जातो. असे बचत गट अध्यक्ष अर्चना सातव यांनी सांगितले या उपक्रमास विशेष सहभाग उपाध्यक्ष हर्षदा सातव, कविता खाडे, नीता आवडे, माधवी शेडगे, सुप्रिया सूर्यवंशी, विद्या जाधव, वंदना जाधव, वर्षा पाचांगणे, स्वरुपा जाधव गौरी जराड, वैशाली परजणे,राजश्री परजणे,भारती चिकणे ,कल्पना बगाडे ,सुनिता बारवकर, अमृता सुर्यवंशी सह अनेक महिला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment