बारामतीत चिखलमय झाले रस्ते..अनेक वाहने घसरून पडली.
बारामती:-बारामतीत नुकताच राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी(अजित पवार गट)चे जनसन्मान रैली चे अयोजन करण्यात आले होते यासाठी मिशन हायस्कूल ग्राउंड प्लेन करण्यात आले होते,यासाठी तयारी ही जय्यत झाली होती पण ऐन वेळेस पाऊस आल्याने हे मैदानात चिखलाचा राडा झाला यामुळे याठिकाणी असणारे पार्किंग मधील वाहने चिखलात रुतले गेले आणि त्याचा चिखल टायरला चिकटल्याने तो डांबरी रस्त्यावर वाहने आल्याने संपूर्ण रस्ते चिखलमय झाले, मात्र या चिखलमय रस्त्यावर टू व्हीलर वाहने ये जा करताना घसरून पडल्याचे जागोजागी दिसत होते.याबाबत बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना याची कल्पना दिली मात्र ते आजारी असल्याचे समजले, पण या रस्त्यावर किमान अग्निशमन गाडीच्या पाण्याने फवारे मारले असते तर रस्त्यावरील चिखल काही अंशी धुवून गेला असता मात्र तसे होऊ शकले नाही आणि याचा फटका मात्र वाहने घसरून पडलेल्या नागरिकांना बसला. कारण बारामती नगरपालिकेची अग्निशमन गाडी मुख्यमंत्रीच्या ताफ्यात पंढरपूर कडे गेली असल्याचे समजले,बारामतीत खऱ्या अर्थाने गरजेची असताना ती बाहेर गेल्याने उपलब्ध होऊ शकली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.पण बारामतीत रस्त्यावर साचलेल्या चिखल वाहने घसरून पडण्यास कारणीभूत ठरत होती यामध्ये काहीजणांना किरकोळ दुखापत झाली व झालेला त्रास मात्र पुरता आठवणीत राहण्यासारखा झाला असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment