बारामतीत महिला,मुली सुरक्षित आहे का?अवैध धंदे चालू असल्यानेच गुन्हेगारी वाढली.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 28, 2024

बारामतीत महिला,मुली सुरक्षित आहे का?अवैध धंदे चालू असल्यानेच गुन्हेगारी वाढली..

बारामतीत महिला,मुली सुरक्षित आहे का?अवैध धंदे चालू असल्यानेच गुन्हेगारी वाढली..
बारामती:-बारामतीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व सामान्य नागरिकांनी रस्त्यावर आले पाहिजे कारण आज आपल्या मुली, महिला सुरक्षित असावी यासाठी चिंतेत असणारा सर्व सामान्य नागरिक मोठी अपेक्षा ठेवून आहे की, बाहेर गेलेली मुलगी, महिला यांना कुणी छेडले तर नाही ना?अशी मनामध्ये शंकेची पाल चुकचुकून जाते. कारण बारामतीत अनेक घटना घडून गेल्या की ज्या मुळे दहशतीत असलेले नागरिक बोलताना आपल्या भावना व्यक्त करीत आहे.बारामती तालुक्यात अवैध धंदे सुसाट चालू असून त्याकडे कुणाचे लक्ष नाही कारण ते कुणाच्या आशीर्वादाने चालतो हे दिसत आहे, काही  महिन्यांपूर्वी एका मुला मुलीला काही युवकांनी कपडे काढून त्यांचं व्हिडिओ काढला याच उदाहरणे ताजे असताना पुन्हा महिला असुरक्षीत असल्याचे दिसुन येत आहे. बारामती कायदा सुव्यवस्थेला धक्का पोहोचला आहे. वंजारवाडी येथील ही घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.वंजारवाडी येथील
संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाच्या पुलापासून काही अंतरावर वॉकिगचा व्यायाम करत असलेल्या महिलेला लघुशंकेच्या निमित्ताने पिकात गेल्यानंतर लक्ष ठेवून असलेल्या तीन नराधमांनी लुटले व तिचा गैरफायदा घेत तिला अर्धनग्न केले व तिचे फोटो काढले. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.बारामतीत महिलेंच्या सुरक्षा वरती प्रश्नचीन्ह निर्माण झाले आहे. 32 वर्षे असलेल्या महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडल. त्या ठिकाणी तिच्यावर नजर ठेवून असलेल्या एकाने तिच्या पाठीमागे जाऊन गळ्याला चाकू लावला व गळ्यातील
दागिने काढ असे सांगितले. ही महिला गळ्यातील दागिने काढत असतानाच आणखी दोघेजण तिथे
आले. यातील एकाने तिचे तोंड दाबून तिचा मोबाईल हिसकावून घेतला व तिला कपडे काढण्यास सांगितले.तिने त्यास नकार दिला असता, तिची ओढणी फेकून दिली व तिचा टॉप फाडून टाकला. हे तिघेही 25 ते 32
या वयाच्या दरम्यानचे होते अशी फिर्याद या महिलेने बारामती तालुका पोलिसांना दिली. त्यावरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांचा बारामती तालुका पोलीस शोध घेत आहेत. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.तर मेडिकल कॉलेज परिसर व  मागील बाजूस निर्जन स्थळी अजूनही kahi युवक मुलीची छेड काढत असल्याचे तेथील नागरिक सांगत आहे,या साठी पोलिसांची गाडी राउंडला फिरणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. तर अश्या ठिकाणी लॉजवर तपासणी करणं गरजेचं आहे जेणेकरून चुकीचं चालू तर नाही ना?

No comments:

Post a Comment