*11 ऑगस्टला निरंकारी मिशनचा बाल समागम बारामतीत*
बारामती (प्रतिनिधी) :- संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने यावर्षी सातारा झोनचा बाल समागम बारामतीत संपन्न होणार असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
सदरचा बाल समागम रविवारी (ता.11) येथील सिद्धिराज लाॅन्स या मंगल कार्यालयात (फलटण रोड) 11 ते 2 या वेळेत संपन्न होणार आहे.
हा बाल समागम संत निरंकारी मिशनचे युवा प्रचारक तेजस आमले (नाशिक) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या समागमात बारामतीसह सातारा झोन मधील हजारो बालकांसमवेत त्यांचे आई वडील देखील उपस्थित राहणार आहेत.
रविवारी संपन्न होणाऱ्या या बाल समागमातील बालक अध्यात्मा विषयी कोणते धडे देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष करून या धावत्या युगात अध्यात्मिक जीवन कसं जगलं पाहिजे, मनुष्य जन्म कशासाठी मिळाला त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे?, आजचा माणूस सुखी समाधानी का नाही, भक्ती का करावी? कशासाठी करावी?, कोणाची करावी अध्यात्म म्हणजे काय ? संस्कार म्हणजे काय? या व अशा अनेक प्रकारच्या विषयावर ती बालकं आपापल्या विचारातून अथवा गीतातून परखडपणे मत व्यक्त करणार आहेत. तरी सर्वांनी या बाल समागमचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री. झांबरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment