दहीहंडी उत्सवात ध्वनी प्रदुषणाचे 18 गुन्हे;बीम लाईट व लेझर लाईट वापरणाऱ्या मित्र मंडळ ट्रस्टवर गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 29, 2024

दहीहंडी उत्सवात ध्वनी प्रदुषणाचे 18 गुन्हे;बीम लाईट व लेझर लाईट वापरणाऱ्या मित्र मंडळ ट्रस्टवर गुन्हा दाखल..

दहीहंडी उत्सवात ध्वनी प्रदुषणाचे 18 गुन्हे;बीम लाईट व लेझर लाईट वापरणाऱ्या मित्र मंडळ ट्रस्टवर गुन्हा दाखल..
पुणे:-नुकताच दहीहंडी उत्सव मोठया दिमाखात झाला आपली संस्कृती जपली पाहिजे त्या अनुषंगाने उत्सव साजरा होताना तो भाविकांच्या मनाला भावेल असा असावा परंतु अलीकडे डी जेचा कर्कश आवाज व रंगबिरंगी डोळ्यांना त्रास होईल असा लाईट शो यामुळे भाविक त्रस्त झाल्याचे पाहिले गेले याच अनुषंगाने पोलीस अधिकारी यांनी वारंवार आवाहन करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने शेवटी गुन्हे दाखल झाले याबाबत मिळालेली माहिती अशी की, दही हंडी उत्सवात  प्रखर बीम लाईट व लेझर
लाईट वापरण्यास बंदी असताना ते वापरणाऱ्या पद्मजा मित्र मंडळ ट्रस्ट दहीहंडी उत्सव समितीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी दहीहंदी उत्सवात ध्वनी प्रदुषण करणाऱ्या १८
मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यात मंडळांचे अध्यक्ष आणि स्पीकर चालकावर गुन्हे दाखल केले गेले आहेत.सहकारनगर येथील शारदाबाई गोविंदराव पवार व्यायामशाळेसमोर पद्मजा मित्र मंडळ ट्रस्ट दहीहंडी उत्सव समितीने
दहीहंडी उभारली होती. त्यात बंदी असताना प्रखर बीम लाईट व लेझर लाईटचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे मंडळाचे आयोजक सागर गौतम उघडे (रा. मोरे वसाहत, पुणे सातारा रोड),अध्यक्ष विनायक विजय मोहिते, उपाध्यक्ष राकेश दत्तू मणेरे, सचिव दिगंबर मधुकर मोहिते यांनी श्री गणेश लाईटचे मालक
गणेश दत्तात्रय डांगे (वय २३, रा. शिवरोली
पूलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)यांच्या मालकीचे प्रखर बीम लाईट व लेझर लाईट दहीहंडी मंडळासाठी लावून सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहीहंदी उत्सवात ध्वनी प्रदुषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केलेल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ मंडळे आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांचे डी जेचे आवाज १०० डेसिबलच्या पुढे होते. अन्य पोलीस
ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल करण्याचे काम
सुरु आहे.
*मात्र बारामतीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आवाहन करूनही त्याची अंमलबजावणी झाल्याची दिसत नसल्याने अनेक भाविकांची नाराजी दिसली.*

No comments:

Post a Comment