बारामतीत 30000/-रू किंमतीचे मंगळसुत्र बळजबरीने हिस्का मारून चोरणाऱ्यास अटक..
बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 658/2024 भारतीय न्याय संहिता 309(4) कलमानुसार गुन्हा दाखल झाला असून ही फिर्याद प्रगती दत्तात्रय बोदंर वय 24 धंदा मजुरी रा. मेखळी रोड, आण्णा पाटील वस्ती, गुणवडी ता. बारामती जि.पुणे यांनी दिली असून यामध्ये आरोपी तोहसिन गफार बागवान वय 34 वर्ष रा. कसाब गल्ली बारामती ता. बारामती जि. पुणे यास अटक केली असून याबाबत घडलेली हकीकत अशी की, दि. 26/08/2024 रोजी दु2 च्या दरम्यान बारामती शहर हद्दित स्वामी समर्थ मंदीराचे कडेला नगरपालीकीचे सार्वजनिक शौचालया समोर एक अज्ञात इसम माझे समोर येउन जबरीने माझे गळ्यातील पाउण तोळे वजनाचे एक सोन्याचे काळ्या मण्यात व दो-यात ओवलेले 6 दोन वाट्या असलेले मंगळसुत्र एकुण 30000/-रू चे बळजबरीने हिस्का मारून जबरीने चोरून नेले आहे व त्या इसमास आजूबाजुच्या लोकांनी पकडुन त्यास पोलीसांचे ताब्यात दिला आहे. पोलीस स्टेशन मध्ये आले नंतर मला पोलीसांकडुन त्याचे नाव तोहसिन गफार बागबान वय 34 वर्ष रा कसाब गल्ली बारामती ता. बारामती जि. पुणे असे असल्याचे समजले आहे. म्हणून माझी त्या चोरटयाविरुध्द कायदेशीर फिर्याद देत असल्याचे सांगितले असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला.
No comments:
Post a Comment