बारामतीत 70,000/-रू किंमतीचे मंगळसूत्र बळजबरीने गळ्याला हिसका मारून चोरी करण्याचा प्रयत्न..आरोपी अटक.
बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 659/2024 BNS 309(5) प्रमाणे नुकताच एक गुन्हा दाखल झाला असून यामध्ये
फिर्यादी शितल नितीन थोरात, वय 42 वर्षे, धंदा- मॅनेजर रा. जळोची ता. बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी कुमार सुभाष खंडागळे, वय 34 वर्षे रा. दहीफळ ता. कळंब जि. धाराशिव, सध्या रा. वसंतनगर, बारामती यास अटक केली असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि.27/08/2024 रोजी सकाळी 10/00 वा चे सु मौजे बारामती शहर हद्दित बारामती बस स्टैंड येथे पार्किंग जवळ बारामती ता. बारामती जि. पुणे येथे इसम नामे कुमार सुभाष खंडागळे, वय 34 वर्षे रा. दहीफळ ता. कळंब जि. धाराशिव, सध्या रा. वसंतनगर, बारामती ता. बारामती जि. पुणे याने माझे गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे एक सोन्याचे दोन डोरले असलेली साखळीतील मिनी मंगळसुत्र अंदाजे 70,000/-रू किंमतीचे बळजबरीने गळ्याला हिसका मारून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणुन माझी सदर इसमांविरुध्द कायदेशीर फिर्याद असल्याचे सांगितले याबाबत पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी यामध्ये आरोपी अटक आहे असे सांगितले.
No comments:
Post a Comment