दुचाकीवर बसून तारूण्यात बऱ्याच जणींना घेऊन फिरलो-अजित पवार. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 10, 2024

दुचाकीवर बसून तारूण्यात बऱ्याच जणींना घेऊन फिरलो-अजित पवार.

दुचाकीवर बसून तारूण्यात बऱ्याच जणींना घेऊन फिरलो-अजित पवार.
सिन्नर:-जनसन्मान  यात्रेचा आज तिसरा दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे.आज ते सिन्नरमध्ये आले असता त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी या तिसऱ्या दिवसाची सुरूवात केली.यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना बुलेट सवारीचा आनंद दिला.अजित पवार म्हणाले, मी कॉलेज जीवनात आणि शेती करत असताना मोटरबाईक वापरायचो. त्यामुळे मोटरबाईकवर फिरायला मला आवडतं. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने आता अडचणी येतात. पण आता बसलोय.तारूण्यात खूप फिरलो.बऱ्याच जणींना घेऊन फिरलो आहे. खूप दिवसांनी दुचाकीवर बसल्याने खूप चांगली भावना आहे.आगामी विधानसभा निवडणूक ही माता-बहिणींची आहे.राज्यातील सत्तेत कुणाला आणायचे हे त्या ठरवणार आहेत. माय माऊलींना गावोगावी जाऊन त्यांचे महत्व पटवून दिले जाईल. आपला भाऊ, मुलगा समजून आशीर्वाद द्या. लाडक्या बहिणींसह विविध घटकांसाठी राबविलेल्या योजना कायमस्वरूपी सुरू ठेवल्या जातील.
महाराष्ट्राची प्रगत राज्य म्हणून ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाईल,असंही अजित पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment