मोरगाव,सुपे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू सप्लायचा कोण आहे मास्टरमाइंड..ज्याच्या पुढे यंत्रणाही झुकते.? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 11, 2024

मोरगाव,सुपे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू सप्लायचा कोण आहे मास्टरमाइंड..ज्याच्या पुढे यंत्रणाही झुकते.?

मोरगाव,सुपे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू सप्लायचा कोण आहे मास्टरमाइंड..ज्याच्या पुढे यंत्रणाही झुकते.?
मोरगाव:-बारामती तालुक्यात व शहरात सद्या जोरात अवैध दारू विक्री होत असल्याचे दिसत असले तरी ही कुठून येते कुठे जाते हे समजण्यापलिकडे जनता दुधखुळी राहिली राहीली नाही, अनेक गावांत आजही अवैध दारू सप्लाय होत असली तरी कारवाई होताना दिसत नाही, जसे माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील काही गावात राजरोस पणे दारू विक्री होते तसेच तीर्थक्षेत्र असणाऱ्या मोरगावात तर सुपे पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या अनेक ठिकाणी आजही अवैध दारू सप्लाय होत आहे, तीन चार पोलीस स्टेशन च्या हद्दी ओलांडून ही दारू राजरोसपणे हॉटेल, ढाबा, व घरगुती तसेच टपऱ्या वर पोहच केली जात असल्याचे कळतंय, मात्र हे दिसूनही आंधळं सोंग आणण्याचं काम होत असल्याचा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे, कारण ही दारू सप्लाय करणारा मास्टरमाइंड हुशार असून त्याचे अनेकांशी लागेबांधे असल्याने कदाचित ही कारवाई होत नसल्याचे कळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग असो अथवा पोलीस प्रशासन असो कारवाई करताना दिसत नाही मात्र गोरगरीब पोटासाठी छोटा व्यवसाय करणार्यांवर कारवाई हमखास होते पण ही कारवाई होताना त्यांना दारू सप्लाय करणाऱ्या मालकावर का होत नाही ही एक शंका सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असल्याचे बोलून दाखवले जात आहे.***

No comments:

Post a Comment