*स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण*
बारामती दि. १५:- भारतीय स्वातंत्र्याचा ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, अपर तहसीलदार महेश हरिशचंद्रे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. यावेळी कार्यक्रमांत मतदान जनजागृतीपर शपथ देण्यात आली.
श्री. नावडकर यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारुन सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment