बारामतीत सावकरकी वाढली..व्याजाच्या पैशासाठी अपहरण करत ठेवले बांधून तिघांविरोधात गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 20, 2024

बारामतीत सावकरकी वाढली..व्याजाच्या पैशासाठी अपहरण करत ठेवले बांधून तिघांविरोधात गुन्हा दाखल..

बारामतीत सावकरकी वाढली..व्याजाच्या
पैशासाठी अपहरण करत ठेवले बांधून तिघांविरोधात गुन्हा दाखल..
बारामती:- गेल्या काही दिवसात सावकारी च्या केसेस वाढल्या असल्याचे दाखल फिर्यादी वरून दिसत आहे,नुकताच ५० हजार रुपये व्याजाने दिल्यानंतर ३० हजार रुपये फक्त व्याजापोटी घेत त्यानंतरही सव्वा दोन लाखांची मागणी करण्यात आली. त्यापोटी मोटार जबरदस्तीने ओढून नेण्यात आली. शिवाय एकाचे अपहरण करत
त्याला डांबून ठेवण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघांविरोधात अपहरणासह, मारहाण व सावकारी अधिनियमासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला.सागर गवळी (रा. माळावरची देवी, बारामती), विकास माने (रा. माळेगाव, ता. बारामती) व विक्रम थोरात (रा.एमआयडीसी, जळोची रोड, बारामती) अशी गुन्हा दाखल
झालेल्यांची नावे आहेत. स्वाती सुरेश ननवरे (रा.
हरीकृपानगर बारामती, मूळ रा. बोराटेवस्ती नातेपुते, ता.माळशिरस, जि. सोलापूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.त्यांचे पती सुरेश यांचे या घटनेत अपहरण करण्यात आले.मोटार देखील नेली ओढून दि. २२ मार्च रोजी त्यांचे पती यांनी ५० हजार रुपये आठवडा १ टक्के व्याजाने घेतले होते. त्यापोटी ३० हजार रुपये व्याज दिले होते. तरीही आणखी २ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली जात होती. त्यापोटी सातत्याने
त्रास दिला जात होता. आरोपांनी व्याजापोटी ननवरे यांच्याकडील मोटार (एमएच १२ एमएम ९६९०) ही जबरदस्तीने नेली. शिवाय व्याज देत नसल्याच्या कारणावरून २० मे रोजी रोजी सुरेश ननववरे यांचे अपहरण करत त्यांना नेण्यात आले. तांदूळवाडीतील  म्हसोबा मंदिराजवळी ओढ्यात त्यांना बांधून ठेवण्यात आले. अखेर सावकारांचा त्रास असह्य झाल्यानंतर या
प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली.

*तक्रारींसाठी पुढे या नागरिकांनी बेकायदा
सावकारी करणाऱ्यांविरोधात तक्रारींसाठी
निर्भयपणे पुढे यावे. पोलीसांकडून त्यांना
आवश्यक ते सहकार्य केले जाईल. या महिन्यात शहर पोलीसांनी बेकायदा सावकारी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत. ही मोहिम यापुढेही सुरु राहणार असल्याचे संतोष घोळवे,पोलीस निरीक्षक, बारामती शहर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment