धक्कादायक प्रकार..'बुलाती हैं मगर जाने का नहीं !. डेटिंग ॲपवरुन तरुणी बोलवतात..!
मुंबई:- डेटिंग ॲपच्या नावाखाली पुरुषांची फसवणूक होत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले याबाबत समजलेल्या माहितीनुसार भारतात डेटिंग ॲपची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.पण, यामाध्यमातून अनेकांची फसवणूक देखील होत आहे.अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डेटिंग ॲपच्या नावाखाली पुरुषांची फसवणूक होत असल्याचे
पुन्हा एकदा उघडकीस आले.महिला या अॅपच्या माध्यमातून पुरुषांना एका क्लबमध्ये
बोलवतात आणि महागडे पदार्थ आणि दारूची ऑर्डर देतात. तसेच याचे बिल पुरुषांना देण्यास भाग पाडले जाते.भेट झाल्यानंतर नंतर क्लबकडून संबंधित महिला २० टक्के कमिशन देखील घेतात. पण, डेटवर येत असलेल्या
पुरुषांना याची काहीच कल्पना नसते अन् ते जाळ्यात अडकतात. एका 'क्लब'मधून एक प्रकरण समोर आले. अनेक पुरुषांना
आपल्या जाळ्यात फसवणूक संबंधित महिलांनी पैसे उकळण्याचे काम केले.महिला पत्रकार यांनी संबंधित घटना उघडकीस आणली. डेटिंग अॅपवरील महिला पुरुषांना भेटायला
बोलवतात आणि क्लबमध्ये घेऊन जातात. तसेच मेन्यूमध्ये उल्लेख नसलेल्या गोष्टींची मागणी करतात. काही वेळ त्यांच्यासोबत घालवल्यानंतर अचानक तिथून पळ काढतात. सर्व बिल पुरूषांना भरावा लागतो, ज्याची किंमत २३,००० ते ६१,००० रूपयांच्या घरात असते.दरम्यान, या कटात सहभागी असलेल्या महिला पुरुषांनी
भरलेल्या बिलामधून १५ ते २० टक्के कमिशन घेतात.संबंधित क्लबमध्ये दररोज कमीत कमी १० पुरुष येत असतात. अनेकांनी पोलिसांत याची तक्रार केली आहे.याप्रकरणी मुंबई पोलिसांनी संबंधित क्लबला सूचना दिली
आहे आणि प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
माहितीनुसार, मुंबईतील इतरही काही क्लबमध्ये हा प्रकार चालतो. याप्रकारे अनेकांची फसवणूक केली जाते. डेटिंग ॲपच्या माध्यमातून अशा प्रकारच्या महिलांची टोळी पुरुषांची आर्थिक फसवणूक करते. अशा क्लबमध्ये पीआर
कर्मचारी म्हणून महिलांची भर्ती केली जाते. मग या महिला Tinder, Bumble यांमाध्यमातून पुरुषांना क्बलमध्ये बोलवतात आणि धोका देतात.त्यामुळेच 'वो बुलाती है, मगर जानेका नही'..!
No comments:
Post a Comment