धक्कादायक..महिलेचे डोके, हात,पाय कापून धड फेकले नदीपात्रात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 27, 2024

धक्कादायक..महिलेचे डोके, हात,पाय कापून धड फेकले नदीपात्रात...

धक्कादायक..महिलेचे डोके, हात,पाय कापून धड फेकले नदीपात्रात...
पुणे:-वाढती गुन्हेगारीतून धक्कादायक प्रकार उघडकीस येऊ लागले आहे नुकताच शहरात अत्यंत भयानक खून झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड
पोलिसांना आढळले आहे. खून झालेल्या
या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतके
आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खराडी
परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम
सुरू आहे. येथून जवळच असलेल्या
नदीपात्रात एका महिलेचे हात पाय आणि
डोके नसलेल्या अवस्थेत धड असल्याची
माहिती मिळाली होती.  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. मयत तरुणीची ओळख अद्याप
पटली नाही. या तरुणीचे वय अंदाजे १८ ते
३० इतके आहे. अज्ञात इसमाने ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे धडापासून
शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय
खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साह्याने
कापून टाकले. त्यानंतर हे धड मुळा-मुठा
नदीपात्रात टाकून दिले. याप्रकरणी अज्ञात
व्यक्ती विरोधात चंदननगर पोलीस
ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. याबाबत पोलीस अधिक
तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment